१०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयातून चांगली आरोग्य सेवा मिळणार : रोहयो मंत्री भरत गोगावले

१०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयातून चांगली आरोग्य सेवा मिळणार : रोहयो मंत्री भरत गोगावले

महाड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भुमीपुजन

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड- महाड पोलादपूर तालुक्यातील गोरगरिब जनतेला छोट्या मोठ्या आजारावरील उपचारासाठी माणगांव अलिबाग मुंबई येथे जावे लागू नये त्यांना महाडमध्येच चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाड ग्रामिण रुग्णालयाच्या आवारात १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होत असून या रुग्णालयातून गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, खारभुमी विकास व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी महाड येथे केले.महाड येथील १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे भुमीपुजन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. अशोक नांदापुरकर उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ, डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक रायगड, कार्य. अभि. नामदे, डिवायएसपी काळे, महेश शितोळे तहसिलदार महाड, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री गोगावले यांनी सांगितले की महाड येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे असे महाडकरांचे स्वप्न होते. मागच्या युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खालील सरकारने महाड येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता देऊन या ठिकाणी ४ मजली इमारत बांधण्यासाठी ८२ कोटी निधी मंजुर केला. या इमारतीखाली पार्किंगची व्यवस्था असणार आहे असे गोगावले यांनी सांगितले.आजमितीला महाड ग्रामिण रुग्णालयातून सर्व प्रकारच्या आजारावर उपचार होत नसल्याने रुग्णांना माणगांव अलिबाग मुंबई येथे जावे लागते. खासगी रुग्णालयांची फि त्यांना परवडत नाही यासाठी महाड येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व केंबुर्ली येथे २०० खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे असे सांगत शासनाच्या आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयात विविध आजारासाठी आकारल्या जाणाऱ्या फि बाबतची नियमावली ठरवून द्यावी अशी सूचना मंत्री गोगावले यांनी यावेळी केली. यावेळी तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून उपस्थितांना तंबाखू न खाण्याची शपथ देण्यात आली .याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरण व नुतनीकरणाचे उद्घाटन,सायली कॉम्प्लेक्स् दस्तुरी नाका येथील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराज बगीचा विकसन भुमीपुजन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.