*भगत सिंग फॅन्स कडून “सेल्फी विथ खड्डा”*
*आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे रहदारीस अडचण.*
*राज्य व केंद्र शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी अनोखा उपक्रम.*

*आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे रहदारीस अडचण.*
*राज्य व केंद्र शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी अनोखा उपक्रम.*
*/अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/*
*अहेरी:-* मुख्यालयापासून आलापल्ली ते सिरोंचापर्यंत शंभर किलोमीटरचा रस्ता हा 153 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये मोडतो. मात्र, या महामार्गाची दूरवस्था ग्रामीण भागातील पायवाटेपेक्षाही दयनीय झाली असून ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे अपघात वाढले आहेत. त्यामुळे या महामार्गावरचा प्रवास जीवघेणा झाला आहे. रहदारी करणाऱ्या नागरिकांची समस्या लक्ष्यात घेऊन राज्य व केंद्र शासनाचा लक्ष वेधण्यासाठी येथील भगत सिंग फॅन क्लबचे पदाधिकाऱ्यांकडून सेल्फी विथ खड्डा हा अनोखा उपक्रम राबविण्यात आले आहे.
हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था एखाद्या खेडेगावातील रस्त्याहूनही बिकट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांन समेत रुग्णवाहिका देखील अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. या वाईट अवस्थेतील मार्गामुळे अनेक अपघात घडण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच काही अपघातात नागरिकांना जिवालाही मुकावे लागले. या मार्गावर इतक्या प्रमाणात अपघात होत असतानासुद्धा शासन व प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे.
या मार्गावरून आंतरराज्यीय मालवाहतूक वाहने रात्रंदिवस चालतात. यात आंध्र प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यात मालवाहतूक केली जाते. त्यामुळे या मार्गाची दूरवस्था झालेली आहे. येथे अतिरिक्त भार घेऊन वाहतूक होत असतानाही संबंधित विभागाने कधीच लक्ष दिले नाही. हा मार्ग दिवसेंदिवस दयनीय अवस्थेत जात असतानाही राज्य व केंद्र शासनाने सोबतच स्थानिक आमदार व खासदार यांनी कोणताही पाठपुरवठा केला नाही.
सध्या या मार्गाची भयानक अवस्था पाहून अनेकांनी या मार्गाचा वापरच बंद केला आहे. पण, सिरोंचाहून अहेरी किंवा गडचिरोली मुख्यालयात विविध शासकीय व इतर कामांसाठी अनेक नागरिकांना सतत ये-जा करावी लागते. मात्र, या मार्गाने प्रवास करताना त्यांची हाडे खिळखिळी होत आहेत. दोन- पाच फुटांचे मोठे खड्डे असल्याने वाहनांचे संतुलन बिघडते. अनेकदा वाहने खड्ड्यात फसतात. पूर्वीच्या वेळेपेक्षा आता या मार्गाने प्रवासाला दुप्पट वेळ लागत आहे. याशिवाय सिरोंचा तालुक्यात कुणी आजारी असल्यास अशा गंभीर आजारी रुग्णाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात किंवा गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणणे जवळपास अशक्य झाले आहे.
रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे रुग्णवाहिकेतच अनेकदा रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे आता तरी राज्य व केंद्र शासनाने नागरिकांचे समस्या लक्ष घेऊन आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे नावीन्यपूर्ण रस्ता दुरुस्तीचे काम करावे. यासाठी “सेल्फी विथ खड्डा” काढून भगत सिंग फॅन क्लबचे पदाधिकारी दिपक सुनतकर, ॲड. पंकज दहागावकर, आशिष सुनतकर, अश्विन मडावी, शुभम नीलम, सुधीर कोरेत आदींनी लक्ष वेधले.
*पर्यटनावर परिणाम -*
आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर कमलापूर हत्ती कॅम्प, रानम्हशींचे कोलामार्का संरक्षण क्षेत्र, देचलीपेठा परिसरातील गिधाडांच्या विणीचे ठिकाण, अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. शिवाय सिरोंचा तालुक्यात ब्रिटिशकालीन विश्रामगृह इतर ऐतिहासिक इमारती, वडदम जिवाश्म पार्क, सोमनूर संगम, श्री क्षेत्र कालेश्वर अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटनस्थळाला वर्षभर पर्यटक भेट देत असतात. पण, या महामार्गाच्या दुरवस्थेमुळे पर्यटक फिरकेनासे झाले आहेत.