हिंगणघाट येथील पोलीस कर्मचा-यांने केला महिला नर्सचा विनयभंग.
हिंगणघाट येथील पोलीस कर्मचा-यांने केला महिला नर्सचा विनयभंग.

हिंगणघाट येथील पोलीस कर्मचा-यांने केला महिला नर्सचा विनयभंग.

हिंगणघाट येथील पोलीस कर्मचा-यांने केला महिला नर्सचा विनयभंग.
हिंगणघाट येथील पोलीस कर्मचा-यांने केला महिला नर्सचा विनयभंग.

ठळक मुद्दे
आरोपी पोलिसाने लग्नासाठी जबरदस्ती केली.
नर्स महिलेचा विनयभंग मोबाईलच्या बहाणाने साधली जवळीक
====================

✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट,दि.31 जुलै:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहरातून एक खळबळजनक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. हिंगणघाट पोलीस ठाण्यात कार्यारत असलेल्या एका पोलीस कर्मचा-याने एका रुग्णालयात काम करणारा महिला नर्सचा विनयभंग केला. त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. महिला नर्सचा विनयभंग करण्यारा आरोपी पोलीस कर्मचारी नाव अरुण हरीदास उघडे (बकल नंबर 649) वय 49 वर्ष, राह तरोडा जिल्हा वर्धा असे आहे. हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी पोलीस कर्मचारी अरुण उघडे याला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार हिंगणघाट येथील रुग्णालयात काम करणा-या एका महिला नर्सचा मोबाईल काही दिवसा चोरी झाला होता. त्याची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली असता, अरुण उघडे हा त्यावेळी ड्यूटी वर होता उघडे याने सांगितले की मी तुझा मोबाईल मिळवुन देतो.

त्या महिला नर्सचा मोबाईल फोन मिळाला नाही त्यामुळे अरुण उघडे याने त्या महिला नर्सला नविन मोबाईल फ़ोन घेऊन दिला. त्यामुळे त्याचे बोलने सुरु झाले. त्यातून त्याने त्या महिला नर्स वर लग्नासाठी जबरदस्ती करायला सुरवात केली. अरुण उघडे याचे वाईट वर्तन बघता ती आता त्याचा बरोबर बोलत नव्हती.

नेमकं काय घडलं?
माझा बरोबर बाहेर फिरायला चल, आपण दोघ कुठे तरी बाहेर जाऊ असे बोलून पोलीस कर्मचारी अरुण उघडे याने त्या महिला नर्सचा जबरदस्तीने हात पकडला आणि तिचा विनयभंग केला. पोलीस कर्मचारावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे. पोलीस कर्मचारी अरुण उघडे यांच्यावर ते कार्यरत असलेल्या हिंगणघाट शहर पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नर्स महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here