पुजाऱ्याकडे नेणाऱ्या नवजात अर्भकाचा रुग्णालयात उपचार सुरू* ● *उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार भागवत कडून त्या बाळावर उपचार सुरू*

*पुजाऱ्याकडे नेणाऱ्या नवजात अर्भकाचा रुग्णालयात उपचार सुरू*

● *उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार भागवत कडून त्या बाळावर उपचार सुरू*

पुजाऱ्याकडे नेणाऱ्या नवजात अर्भकाचा रुग्णालयात उपचार सुरू* ● *उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार भागवत कडून त्या बाळावर उपचार सुरू*
पुजाऱ्याकडे नेणाऱ्या नवजात अर्भकाचा रुग्णालयात उपचार सुरू*
● *उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार भागवत कडून त्या बाळावर उपचार सुरू*

*/अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी ,9405855335/*

*अहेरी :-* जिल्हातील शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या भामरागड तालुक्यातील कोठीटोला येथील रहिवासी सरिता लेकामी ही महिला बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येते भरती झाली, त्यानंतर सोमवार ला सरिताने गोंडस बाळाला जन्म दिला त्यानंतर भामरागड वरून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रेफेर करण्यात आले.
रुग्णालयात जास्त दिवस होत असून आमच्या बाळाची प्रकृती बरी होत नसल्याचे कारण सांगून सरिताचे सासु सासरे आपल्या नवजात नातवाला गावाकडे घेऊन जाऊन पुजाऱ्याकडे घेऊन जाण्याच्या मार्गावर होते, ही बाब येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार भागवत यांना माहिती होताच त्यांनी माडिया भाषेतील सहकारी ला घेऊन त्यांची समजूत काढली व डॉ भागवत यांच्या अथक प्रयत्नाने सरिता चे सासू सासरे रुग्णालयातच उकपचारासाठी तयार झाले.
उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर तुषार भागवत यांनी या आधी ही नवजात अर्भकाच्या पालकांना व नातेवाईकांना पुजाऱ्याकडे न जाऊ देता रुग्णालयात उपचार करून बरे केले आहे. मात्र आजही अंधश्रद्धेपोटी आदिवासी भागातील अनेक परिवार पुजाऱ्याकडे आपल्या पाल्यांना नेऊन जीव धोक्यात टाकतात आणि प्रकृती जास्ती खराब झाल्यावर रुग्णालयात आणतात मात्र तो पर्यंत उशीर झालेला असतो.

*बाळाला रक्त चढविण्यासाठी भागवत यांचा पुढाकार*

बाळाच्या शरीरात रक्त कमी असल्याने A पासिटीव्ह रक्ताची आवश्यक होती डॉ तुषार भागवत यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते विकास तोडसाम यांना संपर्क साधून रक्त उपलब्ध करून दिले.

*125 किलोमीटरचा प्रवास झालं कमी*

मागील दोन वर्षांपासून डॉ तुषार भागवत यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत असल्याने अतिदुर्गम भागातील बांधवाना नागपुरात गडचिरोली चंद्रपूर जाण्याऐवजी अहेरीच सेवा मिळत असून 125 किलोमीटरचा प्रवासाचा शारीरिक आर्थिक मानसीक त्रास दूर झाले आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवामध्ये आत्मविश्वास वाढून ते आता आधुनिक औषधोपचार घेण्यास उपजिल्हा रुग्णालयकडे धाव घेत आहेत.