साखरी येथे जिल्हा परिषद शाळा व प्रिय दर्शनी विद्यालय साखरी तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण करण्यात आले
पर्यावरणाचे संरक्षण ही एक आपली नैतिक जबाबदारी आहे एक कुटुंब पाच झाडे लावा प्रक्षेत्र अधिकारी – साईनाथ पिंपळशेंडे

✒ संतोष मेश्राम ✒
चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) प्रतीनिधी
राजुरा:- राजुरा तालुक्यातील साखरया गावात अंबुजा सिमेंट फाउंडेशन व प्रिय दर्शनी विद्यालय साखरी तसेच महिला ग्राम संघ साखरी यांच्या संयुक्त विद्यमाने साखरी येथे जिल्हा परिषद शाळा व प्रिय दर्शनी विद्यालय तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण करण्यात आले.
जगा मधी चालू असलेल्या कोरोना महामरिने ऑक्सीजन चे महत्व काय आहे हे जगाला दाखवून दिले, कित्तेक लोकांचे प्राण हे प्राण वायू ( ऑक्सीजन ) ची कमतरता असल्या मुळे गेले आहेत, ही गंभीर बाब लक्षात घेता अंबुजा सिमेंट फाउंडेशन मागील २ महिन्या पासून वृक्षारोपण ची मोहीम हाती घेतली आहे, दोन महिन्यात लाखो झाडांचे वृक्षा रोपण आता पर्यंत झाले आहे व ही मोहीम सतत चालू राहणार आहे, आज झालेल्या वृक्षा रोपण प्रसंगी अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे पि.यु. (युनिट ५१) चे मॅनेजर श्री. विशाल जी भोगावार प्रक्षेत्र अधिकारी – साईनाथ पिंपळशेंडे ,प्रदीप बोबडे, रजनी खानोरकर उपस्थित होत्या. सोबतच ग्राम संघाच्या ग्राम संघ अध्यक्ष – अर्चना ताई अत्राम, सचिव – माधुरी लांडे ,कोषा अध्यक्ष – सुप्रिया भोंगळे, आशा वर्कर्स – अंजुताई नगराळे, सी आर पी – सरोजा तेलंगशोभा कावळे, प्रेमलता वाऱ्हरकर, छायाबाई मडावी, पूजा नवरखेडे, रुपाली डोंगे, सुप्रिया कर्डोळे, व इतर ग्रामस्थ व प्रियदर्शनी विद्यालय चे सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.