जोगेश्वरीत गावडे बंधू आर्ट्सतर्फे गणेश कार्यशाळेचे आयोजन
पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. – ८१४९७३४३८५
जोगेश्वरी :- जोगेश्वरीतील प्रसिद्ध गणेश मूर्तिकार श्री. गावडे बंधू यांच्यावतीने रविवार दि.३१ जुलै २०२२ रोजी लहान मुलांसाठी गणेश कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
जोगेश्वरीतील गावडे बंधू आर्ट्स हे गेल्या ५१ वर्षांपासून पारंपरिक शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचे काम करतात. सलग मागील दोन वर्षांपासून जोगेश्वरी परिसरातील लहान मुलांसाठी गावडे बंधुकडून गणेश कार्यशाळा घेतली जाते. मागील वर्षी ५० ते ६० मुलांना मर्यादित घेतलेला हा उपक्रम यावर्षी दोन टप्प्यात १२० मुलांमध्ये घेण्यात आला. रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत १ ली ते ६ वी हा पहिला गट व दुसरा गट ११ ते १ यावेळेत ७ वी आणि इतर पुढील विद्यार्थांसाठी ही कार्यशाळा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली.
सध्याची मोबाईल विश्वात रमणारी लहान मुले गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेमुळे प्रोत्साहित झाली. या कार्यशाळेसाठी लहानग्यांचा सहभाग कौतुकास्पद होता. लहान मुलांमध्ये माती कामाची आवड लागावी आणि भविष्यात नामवंत कलाकार आपल्यासमोर घडावे, असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गावडे बंधू आर्टस् यांच्याकडून या गणेश कार्यशाळेचे आयोजन करून अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.