पडोली येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड,
एकूण 5 लाख 59 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर ब्युरो चीफ
📱 8830857351
चंद्रपूर : 31 जुलै : -पोलीस स्टेशन पडोली परीसरात बंद घरात जुगाराचा खेळ सुरु असल्याचे खबऱ्याद्वारे खात्रीलायक माहितीवरून सापळा रचून धाड टाकली असता एकून १७ आरोपी ईसम कट पत्यावर पैश्याची बाजी लावुन हारजिक चा खेळ खेळत असल्याचे आढळून आले. ही कारवाई कोसारा फाटा ते छोटा नागपुर दरम्यान रोडच्या बाजुला असलेल्या करीमलाला काझी यांच्या भंगार दुकानावर करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की कोसारा फाटा ते छोटा नागपुर दरम्यान रोडच्या बाजुला करीमलाला काझी यांचे भंगार दुकान असुन त्या भंगार दुकाणात असलेल्या टिनच्या शेड असलेल्या बंद खोलीत भंगार दुकाण मालक करीमलाला काझी हा काही ईसमांना कट पत्यावर पैश्याची बाजी लावुन हारजित चा जुगार भरवुन जुगाराचा खेळ खेळवित असल्याची माहिती स्थानिक गून्हे शाखेला प्राप्त झाली होती. या माहीतीवरुन तेथे छापा टाकला असता एकून १७ आरोपी ईसम कट पत्यावर पैश्याची बाजी लावुन हारजिक चा खेळ खेळीत असल्याचे मिळुन आले. आरोपींची अंगझडतीत घेतली असता डावावर नगदी ३७,०००/- रु. एकुन १२ मोबाईल १,३२,०००/-रु., व मोटारसाईकल ७ एकुन ३,९०,०००/- रु. ५२ तास पत्ते किंमत ५०/- रु. असा एकुन ५,५९,०५०/-रुपयाचा माल मिळुन आल्याने या आरोपींविरुद्ध विरुध्द पोलीस स्टेशन पडोली अप क्र २४३ / २३ कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतीबंधक अधिनियम सहकलम १०९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदवून गुन्ह्याचा तपास सुरु आहे. पोलीस अधिक्षक परदेशी सा., अतिरीक्त पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, नंदनवार सा.उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांच्या मार्गदर्शना खाली सापळा रचुन पोलीस स्टेशन पडोली व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी संयुक्त कार्यवाही केली.
या गुन्ह्याच्या छाप्यामधील अधिकारी पो. उपनी जनगमवार, पोहवा कैलाश १७९०, पोअ किशोर/ १२३९.पो.अ. धिरज / १४८२, पो.अ. प्रतीक/२९१३, स्थानिक गुन्हे शाखा पोहवा सुधीर मत्ते, मनोहर रामटेके, सुरेंद्र महतो, पो.अ. दिपक डोंगरे, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदिप महावि आदींनी कार्यवाही केली.