साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कालीना येथे ३ ऑगस्ट रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबिर – डॉ. रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, ३१ जुलै: समाजातल्या शेवटच्या घटकासाठी कार्य करणाऱ्या आणि आपल्या लेखणीद्वारे सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, मनराज प्रतिष्ठान (नोंदणीकृत) यांच्या वतीने एक भव्य मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिराचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) १७५, कलिना विधानसभा व रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट युनियन (नोंदणीकृत) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून हे शिबिर शनिवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत भि. सां. केंद्र, भारत गॅस समोर, कालीना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०००२९ येथे पार पडणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन केंद्र सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री, मा. डॉ. रामदास आठवले साहेब यांच्या शुभहस्ते होणार असून, त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा उपक्रम म्हणजे आरोग्यदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या घटकांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व आरोग्यदायी ठरणार आहे.
नाग मारल्यास नागीण बदला घेते का? नागमणी म्हणजे काय ? नागांविषयी सगळे गैरसमज करा दूर. नक्की वाचा.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चष्मे वाटप:
या महाआरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय तपासण्या व उपचार सुविधा देण्यात येणार असून यात प्रामुख्याने ईसीजी (हृदयाची तपासणी), थायरॉईड तपासणी, साखर (डायबेटीस) तपासणी, दमा (Asthma) ची तपासणी, रक्तदाब (BP) तपासणी, फुल बॉडी चेकअप, नेत्रतपासणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चष्मे वाटप या सर्व सेवा स्थानिक रहिवाशांसाठी पूर्णपणे मोफत असतील. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर, गरजेनुसार आरोग्यविषयक मार्गदर्शनही केले जाईल.
या महाआरोग्य शिबीराच्या आयोजनामध्ये श्रवण मोरे (अध्यक्ष, कालीना विधानसभा) हे मुख्य समन्वयक असून, त्यांच्यासह विजय सकपाळ(सेक्रेटरी), नितीन कांबळे(कार्याध्यक्ष), सुनील सकपाळ (उपाध्यक्ष), अंकुश कांबळे(सचिव), भगवान हाटे (खजिनदार), लखन मगर, दयानंद सावंत, दिनेश शिंदे, रुपेश जाधव, राजू जाधव इत्यादी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. कालीना परिसरातील नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे, सुविधा उपलब्ध करून देणे आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यरत आहेत. या आरोग्य शिबिराचे सह संयोजक म्हणून मोहन मंडल, अरुण कुमार, लक्ष्मण मंडल, अनिल गुप्ता, शिवनारायण, चंद्रदेव मंडल, अर्जुन प्रसाद यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
समता, आरोग्य आणि समाजसुधारणेचा वारसा:
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांना आदर्श मानून, त्यांच्या विचारांना समर्पित आहे असणारा हा उपक्रम समता, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय या मूल्यांना जपणारे, फक्त आरोग्य शिबिर म्हणजे केवळ तपासणीचे केंद्र नाही, तर समाजप्रबोधनाचेही एक माध्यम ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य तपासण्या करून घेण्यासाठी कालीना आणि आसपासच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.