मुख्याध्यापक संघाच्या सभेमध्ये कुलकर्णी सरांचे मार्गदर्शन
महात्मा गांधी विद्यालय हाशिवरेचे नाव गाजविले.
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- तळा माणगाव मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी निवड बैठक न्यू इंग्लिश स्कूल जावळी या शाळेत मुख्याध्यापक सोपान बरगे यांच्या नियोजनाने गुळवणी सर, कळमकर मॅडम, कांबळे सर, जाधव सर, महाडिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर सभेमध्ये महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हाशिवरे येथील संस्कृत अध्यापक तथा करियर मार्गदर्शक व समुपदेशक ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांनी तळा माणगाव तालुक्यातील 32 मुख्याध्यापकांना संबोधित केले. यावेळी कुलकर्णी सरांनी मराठी इंग्रजी हिंदी आणि संस्कृत सुवचनांचा तसेच पौराणिक बोध देणाऱ्या अशा कथांचा कवितांचा वापर करून मुल कसे घडते हे मुख्याध्यापकांना सांगितले. गर्भावस्थेपासूनच मुलावर संस्कार होत असतात आणि त्याचे करिअर हे गर्भावस्थेपासून झालेल्या संस्कार कौटुंबिक आर्थिक सामाजिक परिस्थिती ज्यामध्ये ते मुल वाढले आहे याशिवाय त्या मुलावर शिक्षक पालक समाज समाज माध्यमे यांच्याद्वारे घडलेले संस्कार त्या विद्यार्थ्यांनी निरीक्षणाने आत्मसात केलेले ज्ञान यावर त्याचे करिअर ठरते आणि ते घडते. तसेच मुलांना मुलींना त्यांचे करिअर त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये करू द्या त्यांची आवड ओळखा, जाणून घ्या त्यांना त्यात संधी आहे का त्यांच्यामध्ये बौद्धिक आर्थिक आणि शारीरिक क्षमता आहेत का या तपासा आणि त्यांना मार्गदर्शन करून योग्य करिअर निवडण्यासाठी आणि त्यांना घडविण्यासाठी मदत करा म्हणजे त्यांचे करियर अत्युच्च अशा यशशिखरावर पोहोचेल. तसेच शिशु मध्ये जाणारे मूल प्राथमिक शाळेत जाणारे मुल आणि नंतर किशोरावस्थेमध्ये मानसिक ताण पालकांच्या वाढत्या अपेक्षा अभ्यासाचा दबाव शरीरात होणारे बदल त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या परस्पर आकर्षण युक्त लैंगिक भावना आणि त्यावर मात कशी करावयाची, पालकांशी संपर्क वाढविणे, आपल्या विषयात आपण तज्ञ असावे, आपली ओळख आपल्या विषयानुसार असावी, आपण शिक्षकांसोबत इतर कोणतेतरी आर्थिक उत्पन्नाचे व्यवसाय उद्योग करतो त्यावरून आपली ओळख नसावी, इतर लोक नोकऱ्या करतात आपण मात्र शिक्षक हे व्रत घेतलेल आहे, वसा घेतलेला आहे त्याप्रमाणे आपले आपले विषयावर प्रभुत्व असावे म्हणजे विद्यार्थी पालक परिसर यांचा विकास आपण नक्की साधू शकतो, याविषयीही कुलकर्णी सरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे मावळते अध्यक्ष कांबळे सर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन कुलकर्णी सरांचा येथे सत्कार करण्यात आला.
शेवटी अनेक मुख्याध्यापकांनी हाशीवरे शाळेचे नाव आपल्या या कर्तृत्वामुळे उज्वल होईल असा आशावाद व्यक्त केला. अशाच प्रकारची व्याख्याने आपण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित करून विद्यार्थी शिक्षक व मुख्याध्यापकांना वेळोवेळी संबोधित करावे अशी अपेक्षा तळा माणगाव मुख्याध्यापक संघातील मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. खोखो म्हणजे हाशिवरे हायस्कूल तसेच आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत पोहोचलेली शाळा तसेच अलिबाग तालुक्यातली नावाजलेली शाळा म्हणून सदर शाळेचा लौकीक आम्ही ऐकून होतो परंतु विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक शाळा संस्था आणि परिसरातील पालकांना मार्गदर्शन करणारे कुलकर्णी सरांसारखे उत्कृष्ट संस्कृत अध्यापक आणि मार्गदर्शक व व्यवसाय समुपदेशक या शाळेमध्ये आहेत हे शाळेचे भाग्य आहे असे भावना साबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी व्यक्त केली. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.