बल्लारपूर शहरात आणखी एका हत्येनी बल्लारपूर शहर हादरले
एकाची हत्या 2 गंभीर जखमी, हत्याच सत्र थांबता थांबेना बल्लारपूर शहर गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनत चालले ?

एकाची हत्या 2 गंभीर जखमी, हत्याच सत्र थांबता थांबेना बल्लारपूर शहर गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनत चालले ?
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
सविस्तर वृत्त खलील प्रमाने आहे की
चंद्रपूर जिल्यातील : बल्लारपूर शहर गुन्हेगारीचे केंद्रबिंदू तर बनत चालले नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे कारण बल्लारपूर शहरात पुन्हा काल साय 5:30 वाजताच्या सुमारास बल्लारपूर शहरातील स्क्वेअर पॉइंट बियर बार, विडीयो गेम च्या जवळ आरोपीने फरशी चा तुकड्याने मिलींद बोन्दाळे वय-32 डोक्यावर जबर वार करून हत्या करण्यात आली. धारदार शस्त्र व दगडाने हत्या झाली असल्याची घटना घडली आहे तसेच या घटनेत 2 इसम गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
या संदर्भात सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार मिलींद बोन्दाळे वय-32 वर्ष रा.किल्ला वॉर्ड बल्लारपूर यांची काल साय 5:30 वाजताच्या उपचारासाठी चंद्रपूरला पाठवला तेथ मृत घोषित केला. सुमारास हत्या झाल्याची माहिती असून धारदार शस्त्राने हल्ला करताच घटनास्थळी सदर व्यक्ती मृत पावला असल्याची माहिती आहे. तसेच या हल्ल्यात मध्यस्थी करणारे 2 इसम ही जखमी असून त्यांचेवर चंद्रपुरात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सदर घटनेबाबत शहरात तर्क वितर्काला उधाण आले असून सदर हत्या ही आर्थिक देवाण घेवाणीतून झाली की आणखी काही वेगळे प्रकरण आहे याबाबत स्पष्ट माहिती अजून प्राप्त झाली नसून या प्रकरणात पोलीस तक्रार झाली असून मात्र सदर हत्ये नंतर या प्रकरणातील आरोपी पसार झालयाचे काढताच पोलीस त्यांचा शोध घेत आहेत