महागडया कारनं घेतला तरुणाचा बळी; बीडमधील बड्या नेत्याच्या पोराचा प्रताप.

✒श्याम भुतडा ✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड/परळी, 31.ऑगस्ट:- बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एका नशेच्या मद्यधुंद युवकांने आपल्या महागळ्या आलिशान कारनं रस्त्यावरून जाणाऱ्या एका निष्पाप तरुणाचा बळी घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नशेत असणा-या आरोपीनं सुसाट वेगानं कार चालवत मोटरसायकल या दुचाकी वरुन जात असलेल्या एका तरुणाला जोरदार धडक दिली आहे. ही धडक ही इतकी जोरदार होती की, या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीला धडक देणारी अलिशान कार ही परळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलाची असल्याची चर्चा आहे. संबंधित अपघात परळी शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या तळेगाव परिसरात घडली आहे.
मृतक तरुण प्रमोद भगवान तांदळे हा आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी किंगमेकर नाव लिहिलेली महागळी आलिशान कारनं सुसाट वेगात येत प्रमोदच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे प्रमोद दुचाकीसोबत बराच अंतर दूर फेकला गेला. या घटनेत प्रमोदचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती संपूर्ण शहरात वाऱ्याच्या वेगानं पसरली आहे. यानंतर मृत तरुण प्रमोद तांदळे यांच्या नातेवाईकांनी परळी ग्रामीण पोलीस ठाणे परिसरात ठिय्या आंदोलन केलं आहे. आंदोलन कर्त्यांनी संबंधित कारचालकावर तात्काळ कारवाई करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. परळी पोलीस संबंधित बड्या राजकीय नेत्याच्या मुलावर गुन्हा दाखल करतात का?याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
परळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षानं काही दिवसांपूर्वी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला ही महागळी आलिशान कार भेट म्हणून दिली होती. आपल्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले होती. पण मुलानं तीच कार दारू पिऊन चालवत एका निष्पाप युवकाचा जीव घेतला आहे. या घटनेनंतर नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.