*नागपूर : ‘महिला भन्तेचा खून करून बौद्ध भिक्खूचा 3 वेळ आत्महत्येचा प्रयत्न’*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
एका बौद्ध धर्मप्रचारक पुरुषाने सहकारी भन्ते महिलेची हातोडी आणि चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना नागपूर मध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्याच्या पिपळा (डाक बंगला) येथील शिवली बोधी भिक्खू निवासात ही घटना उघडकीस आली.
आरोपीने ही हत्या प्रेमप्रकरणाच्या वादातून केली, असं प्राथमिक तपासात दिसत असल्याचं नागपूर ग्रामीण पोलीसांनी बीबीसी मराठीला सांगितलं आहे.
या प्रकरणातील 58 वर्षीय आरोपी भदंत धम्मानंद थेरो ऊर्फ रामदास झिनुजी मेश्राम यांनी या गुन्ह्याची कबुली पोलीसांसमोर दिली आहे.
सहकारी महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी रामदास यांनी आत्महत्या करण्याचा 3 वेळा प्रयत्न केला.
18 वर्षात 18 महिलांची हत्या एकाच पद्धतीने करणाऱ्या सीरियल किलरची कहाणी
दलित आई-मुलीचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरही काही प्रश्न कायम
रामदास किटकनाशक खरेदी करण्यासाठी गेल्या त्या कृषी सेवा केंद्रातील लोकांना रामदास यांच्यावर संशय आला. त्यांनी रामदास यांच्या सोबत भिक्खू निवासात जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. नंतर खापरखेडा पोलीसांनी रामदास यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवला.
नागपूर ग्रामीण पोलीसांच्या खापरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुंडलिक भाटकर दिलेल्या महितीनुसार, “या प्रकरणातील आरोपी रामदास झिनुजी मेश्राम आणि कुसुम चव्हाण यांची गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांसोबत ओळख होती. दोघंही बौद्ध धर्मप्रचारक असल्याने कुसुम यांनी श्रामनेरी बुद्धप्रिया तर रामदास यांनी भदंत धर्मानंद थेरो अशी नावं धारण केली होती. गेल्या 12 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबधही होते.
आरोपी रामदास अमरावतीचे रहिवासी होते, पण बौद्ध धर्मप्रचारक झाल्यापासून खापरखेड्याच्या पिपळा डाकबंगला येथील शिवली बोधी भिक्खू निवासमध्ये राहायचे. मुळच्या नागपूर शहरातील असलेल्या कुसुम या विवाहित होत्या. पण पती व्यसनाधीन असल्याने त्यांनी पतीला सोडून त्या धर्मप्रचारक बनल्या होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून कुसुम महादुला, कोराडी येथे राहायला गेल्या होत्या.”
रविवारी (29 ऑगस्ट) कुसुम या शिवली बोधी येथील भिक्खू निवासात आल्या होत्या. रामदास यांच्या सोबत राहण्यावरून त्यांच्यात वाद झाला. वृद्धावस्थेमुळे सोबत राहणे शक्य नसल्याचं कुसुम यांनी रामदास यांना सांगितलं. यातच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. रामदास यांनी कुसुम यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरवात केली. कुसुम यांच्यावर दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत त्यांनी कुसुम यांचा मोबाईल फोन तपासला. मोबाईल मधील चॅटींगचे कारण पुढे करत आरोपी रामदास कुसुम यांच्यासोबत वाद घालू लागले. नंतर वाद विकोपाला गेल्यावर रामदास यांनी चाकूने कुसुम यांच्यावर वार केले. हातोडीनेही कुसुम यांच्यावर हल्ला केला. त्यात घटनास्थळीच कुसुम यांचा मृत्यू झाला,” असं पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणात प्रल्हाद सेवकराम ठाकरे यांनी पोलीस ठाणे खापरखेडा इथं माहिती देत तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी शिवली बोधी भिक्खू निवासामध्ये मृत कुसुम यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
खापरखेडा भिक्खू निवास कुणी बांधलं?
आरोपी रामदास यांनी शिवली भिक्खू निवास असलेली जागा 2017 मध्ये घेतली. गावातील लोकांनी लोकवर्गणी करून भिक्खू निवास बांधलं, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली. याच भिक्खू निवासाशेजारील जागा कुसुम यांच्यासाठी खरेदी करण्याचा रामदास यांचा मानस होता.
या दोघांच्या प्रेमसंबधांची स्थानिकांना माहिती होती, अशी माहिती तपास करणाऱ्या पोलीसांनी दिली आहे. या संबंधावर स्थानिक गावकऱ्यांचा आक्षेप होता.
पण रामदास हे बौद्ध धर्मप्रचारक असल्याने नागरिकांनी त्यांना बौद्ध भिक्खू निवासासाठी मदत केली, असं स्थानिक नागरिक सांगतात. दरम्यान आरोपी रामदास यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली पोलीसापुढे दिली