मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण द्या, शेकडो वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद मध्ये आंदोलन.

✒औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी✒
औरंगाबाद :- राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणामुळे वातावरण आधीच तापलेले आहे. मराठा, ओबीसी समाज आक्रमक आहे. असे असताना औरंगाबादेत मुस्लीम आरक्षणाला घेऊन मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज (30 ऑगस्ट) औरंगाबाद शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले.
मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या
वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या या आंदोलनादरम्यान शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. तसेच विभागीय आयुक्तालयासमोर दोन तास आंदोलन करत विभागीय आयक्तांना या संदर्भात निवेदन दिले. लवकरात लवकर या मागणीवर कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला.