निसर्ग साथी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण कडु यांना ‘हिंगणघाट भुषण’ पुरस्काराने सन्मानित.

निसर्ग साथी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण कडु यांना ‘हिंगणघाट भुषण’ पुरस्काराने सन्मानित.

निसर्ग साथी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण कडु यांना 'हिंगणघाट भुषण' पुरस्काराने सन्मानित.
निसर्ग साथी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण कडु यांना ‘हिंगणघाट भुषण’ पुरस्काराने सन्मानित.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट:- स्थानिक हिंगणघाट सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व विविध सामाजिक उपक्रम राबविणा-या श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्था, हिंगणघाटच्या वतीने हिंगणघाट शहरात प्रथमच हिंगणघाट भुषण सन्मान सोहळा तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन स्व. नारायणराव हवाईकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबीर, नेत्रदान संकल्पाचे आयोजन शितलामाता मंदिरात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार समिर कुणावार हे होते.वनश्री दिगांबररावजी खांडरे, वणा ना. बँकेचे अध्यक्ष ह्दयरोगतज्ञ डाँ निर्मेशजी कोठारी, नेत्ररोगतज्ञ डाँ स्नेहलजी चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात हिंगणघाट शहरातील निसर्ग साथी फाऊंडेशन च्या कार्याची दखल घेऊन निसर्ग साथी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण कडु यांना “हिंगणघाट भुषण ” पुरस्कार शाल, श्रीफळ आणि मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देउन गौरविण्यात आले. प्रविण कडु ना हि़गणघाट भुषण ने सन्मानित करण्यात आल्या‌ बदल निसर्ग साथी चे प्रा डॉ. बालाजी राजुरकर, प्रभाकर कोळसे, गुणवंत ठाकरे,नियाजुद्दीन,राकेश झाडे, राजश्री विरुळकर‌, अनिल‌ कानकाटे, संगीता मस्कर, परिक्षीत ढगे, अरविंद दहापुते आदींनी अभिनंदन केले.