सेलू येथील गट ग्रामपंचायतला आवाज इंडिया टीव्ही चॅनलच्या वतीने ऑक्सीजन सिलेंडर वाटप.

✒युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- कळमेश्वर पासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सेलू गटग्रामपंचायत येथे आवाज इंडिया चैनलच्या वतीने ऑक्सिजन गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले यात आवाज इंडिया चैनल चे चीफ एडिटर अमन कांबळे, डायरेक्टर प्रीतम बुलकुंदे, प्रफुल भालेराव, कॅमेरामॅन चंदू मडके यांच्या हस्ते गॅस सिलेंडरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच कुंती आसोले, उपसरपंच प्रदीप चणकापुरे, माजी सरपंच सुरेंद्र गजभिये, नागपूर जिल्हा प्रतिनिधी युवराज मेश्राम, युवराज गायकवाड, किशोर आसोले प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपसरपंच प्रदीप चणकापुरे यांनी आवाज इंडिया चैनलच्या वतीने या सिलेंडर दिल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात आले व ग्रामपंचायतच्या संदर्भात माहिती देण्यात आली या सिलेंडर पासून कोरोना संदर्भात सेलू अश्टीकला, निमजी, गुमथळा, लोणारा अशा अनेक गावांना या सिलेंडर पासून लोकांना जीव वाचवण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचप्रमाणे गावातील गावकऱ्यांना सुद्धा यांचा फायदा होणार असल्याचे उपसरपंच यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला गावकरी मंडळी ग्रामपंचायत सदस्य निलेश कामडी, गीता गायकवाड, शशिकला माने, रिंकी गजभिये व गावकरी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.