विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीसह पाच शेळ्यांचा मृत्यू!

विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीसह पाच शेळ्यांचा मृत्यू!

विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीसह पाच शेळ्यांचा मृत्यू!
विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीसह पाच शेळ्यांचा मृत्यू!

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
रायपूर, हनुमान नगर येथील रहिवासी धलसिंग राठोड वय ६० वर्ष हे दिनांक 30 ऑगस्ट रोज सोमवारला आपल्या शेळ्या गावालगत चारायला घेऊन गेले असता, दुपारी दोन वाजताच्या दरम्यान मुसळधार पावसासह विजांचा गडगडाट सुरू झाला पावसापासून बचावासाठी त्यांनी आपल्या बकऱ्यांसह झाडाचा आसरा घेतला असता अचानक त्या झाडावरच विज पडल्याने धलसिंग राठोड सह पाच बकऱ्यांचा जागीच करून अंत झाला.संध्याकाळ होवून सुध्दा धलसिंग आपल्या बकऱ्यांसह घरी न आल्यामुळे त्यांचा परिवार चिंतेत पडला होता, आजूबाजूला त्यांचा शोध घेतला असता, सुरजनगर मागील बंग यांचे शेतात धलसिंग राठोड व बकऱ्या मृतावस्थेत आढळून आले, घटनेची माहिती हिंगणा पोलीसांना देण्यात आली.पो.ह.विनायक मुंढे,व वसंत शेडमाके यांनी पंचनामा करून प्रेत ग्रामीण रुग्णालय हिंगणा येथे पाठविले असून पुढील तपास हिंगणा पोलीस करीत आहेत.