हा खेळ चालतो, अंधाऱ्या रात्री अवैध मुरमाची व रेतीचे नागभीड येथे, खाजगी शाळेत ढिगारे

हा खेळ चालतो, अंधाऱ्या रात्री
अवैध मुरमाची व रेतीचे नागभीड येथे, खाजगी शाळेत ढिगारे

हा खेळ चालतो, अंधाऱ्या रात्री अवैध मुरमाची व रेतीचे नागभीड येथे, खाजगी शाळेत ढिगारे

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड —-मुरमाची कोणत्याही प्रकारची परवानगी मिळत नसल्यामुळे सरकारी कामे ठप्प पडलेली आहेत तसेच रेतीची परवानगी मिळत नसल्यामुळे बहुतेक सरकारी कामे ठप्प पडलेली आहेत परंतु नागभीड येथे रात्र झाली की मुरमाची व रेतीची वाहतूक होताना दिसते अशातच नागभीड येथील संजो पब्लिक स्कूलमध्ये बांधकाम चालू आहे त्यामुळे तिथे रेतीचे ढीग पडलेले आहेत तसेच मुरमाचे शाळेच्या पटांगणात ढीगारे आणून टाकले आहेत. शाळेचे एका कर्मचाऱ्याला याबद्दल विचारणा केली असता तहसीलदाराने संस्थेसोबत संगणमत करून रेती टाकण्याची परवानगी दिली आहे अशी कबुली दिली.मुरूम सुद्धा येथे रात्री वेळेस येते बाहेरून आणून टाकल्या जाते याबद्दल तहसीलदार यांना फोन करून विचारणा केली असता चौकशी लावतो असे सांगितले पण चौकशी लावली नाही मंडल अधिकारी यांना सुद्धा सांगितले असता मी पंचनामा करतो म्हणाले पण नंतर फोन उचलत नाही. नागभीड येतील तलाठ्यांना सांगितले असता जोपर्यंत तहसीलदार साहेब आदेश देत नाही तोपर्यंत मी चौकशी करणार नाही असे उत्तर मिळाले. खरंच त्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुरूम वर रेती साठी संस्थेसोबत व तहसीलदार यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असेल का? चौकशीसाठी दिरंगाई का केली जाते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे