सानेगांव येथील कोळसा जेटी कडील मुख्यरस्ता ते आश्रमशाळा रस्ता झाला चिखलमय..

सानेगांव येथील कोळसा जेटी कडील मुख्यरस्ता ते आश्रमशाळा रस्ता झाला चिखलमय..

सानेगांव येथील कोळसा जेटी कडील मुख्यरस्ता ते आश्रमशाळा रस्ता झाला चिखलमय..

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
दि:31/08/2022

रोहा : सनासुदीच्या धावपळीच्या दिवसात चावरे गोफण तरीणे प्रवास करणारे व शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकत असलेले २००होन अधिक विद्यार्थी, शिक्षकवृद,तसेच सानेगुरुजी विद्या निकेतन चे विद्यार्थी व शिक्षक यांचा मुख्य रस्ता हाच असुन या रस्त्याने ये जा करणाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे.चिखलाचे व घाणीचे साम्राज्य सद्या येथील इंडो एनर्जी कोलसा जेटी कंपनीच्या व्यवस्थापनाने केलेली पहायला मिळत आहे.हे घाणीचे साम्राज्य इतके आहे की तेथुन प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे.या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांच्या मोटारसायकली सुद्धा आहेत.धावपळीच्या जीवनात प्रवास करत असता कंपनीच्या गलथानपणा जीवावर बेतून अपघात होणे नाकारता येत नाही.
हिंदू सणांची मालीका चालू असतांनाच रस्त्यावर अक्षर्षा गोविंदा पहायला मिळत आहे.
रोहा तालुक्यातील सानेगाव जेटीचे अजब कारभार कोलसा जेटीवरील साचलेला चिखल (मडी) अक्षर्षा रस्त्यावर पसरलेल्या अवस्थेत आहे.
इंडो एनर्जी कोलसा जेटी सानेगांव या कंपनीने सणासुदात प्रवासी नागरिकांचे जीव घेण्याचा उपक्रम चालू केला आहे.रस्त्यावरुन विशेषतः टूव्हिलर फोरव्हिलर स्लिप होऊन जाग्यास अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.तोंडावर आलेल्या गौरी गणपतीच्या सणासुदीच्या दिवसांत नातेसमधीत मित्रपरिवार एकदुसऱ्याच्या आमंत्रित करण्यात आलेल्या विनंतीवरून रस्त्यावर रहदारीने तसेच दोन्ही शाळांचे वस्ती विद्यार्थ्यांचा विचार करता रस्ता जणूकाही बोलत असतो अशातच चांगल्या रस्त्याची चिखलमडी टाकून दुरवस्था केल्याची पहायला मिळत आहे.अशी घाणीचे साम्राज्य करणाऱ्या क़पनीच्या कार्यालयीन प्रमुखांना लाजा वाटायला पाहिजे.गौरीगणपतीच्या सणात लोक आनंदाने घरासह गाववेशी कणारांगोळीने नटवत असतात तर हि नालायक कंपनी आमच्या पवित्र सनात हळकट गीरी करुन सुंदर रस्ते मळकट करत आहेत.अशा अवस्थेत अपघात होण्याची दाट शक्यता आहे.अशा परिसरातील रस्ताची दुरावस्था पहाता येथील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या बाबत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड. प्रांताधिकारी रोहा.तहसिल, पोलिस अधीक्षक अधिकारी अलिबाग रायगड, पोलिस स्टेशन रोहा.सां.बां.खात्याचे उपअभियंता,तसेच पंचायत समिती रोहा.अशा सर्व समंधीतांना तातडीने निवेदने देऊन या प्रकाराबाबत जाब विचारणार जर का याची वेळीच दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन छेडणार असे शेवटी माजी जिल्हा परिषद सदस्य नंदुशेठ म्हात्रे यांनी संतापजनक वक्तव्य केले.यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोतीराम गिजे,संतोष दिवकर, खेळू गिजे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.