बिरसामुंडा यांची जन्मभूमी झारखंड येथुन निघालेल्या आदिवासी सुरक्षा यात्रेचे अक्कलकुवा येथे जोरदार स्वागत करण्यात आले…

birsa-munda-marathi-information
प्रकाश नाईक
नंदुरबार ब्युरो चीफ
मो. 📱9511655877

नंदुरबार : दि. 30 ऑगस्ट झारखंड येथून निघालेल्या आदिवासी सुरक्षा यात्रेच्या अक्कलकुवा येथे आगमन झाले होते, त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. आदिवासी सुरक्षा यात्रा ही 9 ऑगस्ट ला झारखंड राज्यातील बिरसा मुंडा यांचे जन्म भूमी झारखंडमधील उलिहातू गावातुन ही आदिवासी सुरक्षा यात्रा सुरु करण्यात आली. ही यात्रा छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, या राज्यात जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. 

या यात्रेचा मुख्य उद्देश आदिवासी समाज हा निसर्गपूजक संस्कृतीचे रक्षण करणारा आहे मात्र आदिवासी समाजाच्या संस्कृतीवर होणारे आक्रमक .दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने आदिवासी विचारधारेला एक करणे,आदिवासींची सांस्कृतिक शुद्धीकरण करणे व सामाजिक आणि राजकीय जागृतता व्हावी तसेच देशातील सर्व आदिवासींना एक व्हावा, मणिपूर सारख्या राज्यात आदिवासींवर झालेल्या अत्याचारांवरुन आदिवासी समाज हा असुरक्षित आहे; आदिवासींना आत्मनिर्भर बनवणे,बोगस आदिवासीं विरोधात आवाज उठवणे, न्यायिक लढाई लढणे, कुठल्याही राजकीय पार्टीचे गुलाम आदिवासींनी बनू नये,आदिवासींची स्वंतत्र राजकीय पार्टी असावी,सर्व आदिवासी संघटना व आदिवासी पार्टी यांना एकत्रित करण्यासाठी आदिवासी सुरक्षा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आदिवासी सुरक्षा यात्रेचा आयोजकांनी सांगितले.

आदिवासी सुरक्षा यात्रेचे आगमन अक्कलकुवा येथे झाले. यात यात्रेचे प्रमुख- राजु वलवाई आदिवासी सुरक्षा यात्रा आयोजक केतन बामनिया, अजय गावीत, आदिवासी टाईगर सेना प्रवक्ता यांचे स्वागत ॲड. रुपसिंग वसावे, ॲड. संग्राम पाडवी, यांनी केले. यावेळी ॲड. देविसिंग पाडवी, ॲड. अमरसिंग वसावे, ॲड. के. आर वसावे. ॲड. एस. एस. वसावे, ॲड. आर. पी. तडवी,ॲड. ए. आर. तडवी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आपसिंग वसावे, मा. उपसरपंच धिमा पाडवी,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here