पावसाचे पाणी आटले,डोळ्यात दाटले…!

पावसाने दांडी मारल्याने महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट सर्वत्रच दिसून येत आहे.राज्यात पाऊस पडला सर्वच काही ठीक होतं.परंतु अचानक पाऊसाने पाठ फिरविल्याने आभाळातुन पाऊस न पडता शेतकऱ्यांचे डोळ्यांतून पाणी निघतांना दिसत आहे, तर दुसरीकडे पाऊसाच्या गैरहजेरीमुळे सर्वसामान्यांना अनेक प्रकारच्या आजारांनी(व्हायरल इन्फेक्शन)जखडल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.यामध्ये डेंग्यू, मलेरिया, ताप, काविळ, डोळे येणे अशाप्रकारच्या अनेक आजारांचा सामना संपुर्ण महाराष्ट्र वासियांना करावा लागतो आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला खरा परंतु सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस आतापर्यंत झालेला आहे.यामुळे राज्यातील पावसाची परिस्थिती अत्यंत भयावह व चिंताजनक आहे.राज्यात आतापर्यंत पडलेल्या पावसाचे प्रमाण अमरावती विभाग 29 टक्के, नागपूर विभाग 55 टक्के, कोकण विभाग 28 टक्के, नाशिक विभाग 20 टक्के, पुणे विभाग 22 टक्के, औरंगाबाद विभाग 22 टक्के अशाप्रकारच्या पाऊसाच्या लंपंडावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे बादल दिसून येत आहे.

आधीच मान्सून उशिरा आला त्यात जून महिना कोरडा गेला.जुलै महिन्यात थोडाफार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या.मात्र ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला.यामुळे महाराष्ट्रातील खरीप पिके संकटात सापडली आहे आणि पाऊसाच्या दांडीमुळे लहान मुलांच्या व वृध्दाच्या प्रकृतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतांना दिसत आहे.त्यामुळे पाऊसाच्या दांडीमुळे आरोग्यावर सुध्दा मोठा गंभीर परिणाम होतांना दिसतो.आतापर्यंत देशातील ईशान्य भारतात सरासरी पेक्षा 19 टक्के,मध्य भारतात 4 टक्के, दक्षिण भारतात 15 टक्के कमी पाऊस झालेला आहे.उत्तर भारतात मात्र सरासरीपेक्षा 8 टक्के अधिक पाऊस झाला असून अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती दिसून येते.महाराष्ट्रात पाऊसाने चांगलीच दांडी मारल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.यामध्ये मानव पशुपक्षी व संपूर्ण जीवजंतू यांना गंभीर परिणाम भोगावा लागत आहे.यावर्षी पाऊसाची टक्केवारी कमी असल्याने पुढे चालून पाण्यामध्ये तुट पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

ऑगस्टमध्येच राज्यात पाणीटंचाई भासायला सुरूवात झाली आहे.त्यामुळे सध्या पावसाच्या सुरू असलेल्या लंपंडावामुळे अनेक जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई दिसुन येते.परिणामी अनेक गावांना आणि वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असुन गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कितीतरी पटीने अधिक असल्याने ऑगस्टमध्येच दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आले आहे.असे सांगितले जाते की 122 वर्षांनंतर प्रथमच ऑगस्टमध्ये एवढा भयावह कोरडा दुष्काळ पडलेला आहे.देशातील काही राज्य वगळता देशभरात पाऊसाची सर्वत्रच बोंबाबोंब दिसून येते. ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक, दक्षिण तेलंगणा,केरळ,पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल,नागालॅंड, मिजोरम, मणिपूर, त्रिपुरा,लक्षव्दीप याभागात अत्यल्प पाऊस पडल्याने इथेही भयावह स्थिती निर्माण झाली आहे. 

मुख्यत्वे करून हवामानातील आमुलाग्र बदल, जंगल कटाई, वाढते औद्योगिकीकरण व परमाणु परिक्षण यामुळे निसर्गाचे संपूर्ण संतुलन डगमगलेले आहे यामुळेच दिवसेंदिवस निसर्ग कोपत आहे.त्याचाच परिणाम आज आपल्याला भोगावा लागतो आहे.वाढत्या तापमानामुळे समुद्राचे पाणी दिवसेंदिवस उष्ण होत आहे.परिणामी भारतीय उपखंडात कमी पाऊस पडत असल्याचे सांगितले जाते.या घटनेला शास्त्रीय दृष्ट्या अल निनो म्हणतात. अल निनोमुळेच भारतातील मानसुनची वाटचाल रोखली जाते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.परंतु आजच्या परिस्थितीत पाऊसाच्या बाबतीत महाराष्ट्र डेंजर झोनमध्ये आल्याचे दिसून येते. विदर्भ आणि मराठवाड्यात 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.म्हणजेच पावसाच्या गैरहजेरीमुळे अनेक कठीणायीचा सामना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व सर्वसामान्या भोगावा लागेल हे स्पष्ट दिसुन येते.

राज्यात पुढील महिनाभरात समाधानकारक पाऊस झाला नाही तर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.म्हणजे सर्वंच गोष्टींचा विचार केला परिस्थिती अत्यंत कठीण व गंभीर आहे.त्यामुळे असं झालं आहे की पाणी आटलं, डोळ्यात साठलं! सध्याच्या परिस्थितीत तर राज्याच्या काही भागात उन्हाळ्या सारखे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली आहे की जगावं की मरावं अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे.कारण धानाच्या शेतीवर विपरीत परिणाम होत आहे, सर्वसाधारण पिके कोमावत आहे,पुढेचालून पिण्याच्या पाण्याची समस्या ओढावतांना दिसत आहे. त्यामुळे राज्यात पावसाने दांडी मारल्याने सर्वत्र दुष्काळाची छाया पसरली आहे.अशा परिस्थितीत भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.कारण धरणे तळाशी, तर पिकांचे प्राण कंठाशी येवून ठेपले आहे.पावसाची कठीण परिस्थिती पहाता संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांनी व पक्षांनी राजकारण बाजूला सारून या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज आहे.

देशातील 21 राज्यांमध्ये सामान्य पावसापेक्षाही कमी पाऊस झालेला आहे.देशातील दक्षिण व पूर्वोत्तर राज्य सोडले तर अनेक राज्यांमध्ये पाऊसाने पाठ फिरवली आहे ही चिंताजनक बाब आहे.मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो हे वरूणराजा लवकरात लवकर पृथ्वीवर प्रगट हो व सर्वत्र पाऊस पडुदे.मी लेखणीच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की जंगल तोड ताबडतोब थांबवुन घर तिथे झाड व पडीत किंवा बंजार जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे.

रमेश कृष्णराव लांजेवार
माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर
मो.नं.9921690779

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here