सावधान…माणगांव तालुक्यातील चांदोरे गावच्या हद्दीत बिबट्यांचा वावर

✍️सचिन पवार 

कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-चांदोरे गावच्या हद्दीत विष्णू भोसले यांच्या घरा जवळ चक्क गेले आठ ते दहा दिवसा पासून बिबटे वाघ आपल्या बछड्यां सोबत वावरताना आढळून येत आहेत. सदर बिबटे वाघ गावच्या लगत शाळा, हायस्कूल व रहदारीच्या ठिकाणी वावरत असल्याने शाळेत येणारी लहान लहान मुले तसेच शेती कडे कामासाठी जाणारे शेतकरी व वाटसरू यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ही गोष्ट लक्षात घेऊन माजी सभापती सुजित शिंदे तसेच माजी सरपंच विष्णू भोसले यांनी माणगाव येथील फॉरेस्ट ऑफिसर ढगे साहेब यांना कळविले.त्यांनी तात्काळ सदर गोष्टीची दखल घेत घटनास्थळी ताबडतोब त्याच दिवशी आपल्या स्टाफला सूचना देऊन चांदोरे विभागाच्या फॉरेस्टर गायकवाड मॅडम यांना पाठवून सुरक्षे सबंधित माहिती ग्रामस्थांना दिली.

फ़ॉरेस्ट खात्यातील कर्मचारी यांनी लवकरात लवकर बिबट्याना व त्याच्या बछडयाना पकडून दूर जगंलात सोडा असं ग्रामस्थाचं म्हणणे आहे. सदर वाघ व बछडे भर वस्ती शेजारी आढळून येत आहेत त्यांचे फोटो देखील पहावयास मिळत आहेत. त्यामुळे या वाघांची दहशत चांदोरे ग्रामस्थ व परिसरात पसरली असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालक घाबरत आहेत. ग्रामस्थ व शेतकरी शेतावर जाण्यास घाबरत आहेत.त्यामुळे भविष्यात मनुष्य हानी व पाळीव प्राणी हानी होऊ नये याकरिता, वन विभाग यानी गांभीर्य लक्षात घेऊन काय उपाय योजना करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here