मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव, मुंबईसाठी महाराष्ट्र लढला आहे, १०५ हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आहे, मुंबई तोडण्याच स्वप्न देखील बघू नका, जितेंद्र आव्हाडांचा भाजपला इशारा
मीडियावार्ता
३१ ऑगस्ट, मुंबई:
मुंबईचा आराखडा यापुढे केंद्रीय संस्था नीती आयोग करणार असल्याच्या बातम्या काल प्रसिद्ध झाल्या. नीती आयोग देशाचा आराखडा तयार करते, त्यांनी एखाद्या राज्याच्या राजधानीचा आराखडा बनवण्याच काम करण्याचं कारण काय..? कारण मुंबई ही काही दिल्लीसारखी केंद्रशासित नाहीये.तरीदेखील तिचा आराखडा निती आयोग,या केंद्राच्या संस्थेकडून करण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे.याचा अर्थ काय आहे..? तर याचा साधा सरळ अर्थ आहे की,मुंबईला “केंद्रशासित” करण्याची खेळी केंद्र करू पाहत आहे.यातून मुंबईच्या आर्थिक नाड्या हातात घ्यायच्या आणि त्याद्वारे मुंबई चे सर्व नियंत्रण मिळवायचे,असे मनसुबे स्पष्टपणे दिसून येत आहेत या शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर आपला विरोध व्यक्त केला.
या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले कि, मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे.105 हुतात्म्यांच्या बलिदानावर ती महाराष्ट्रासोबत उभी आहे.देशात इतर कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक कर भरणारी महापालिका अशी तिची ओळख आहे. काल बातमी आली की, यापुढे मुंबईचा आराखडा,निती आयोग तयार करणार. मुळात निती आयोगाचं काम हे देशाचा आराखडा बनवण्याच आहे.त्यांनी एखाद्या राज्याच्या राजधानीचा आराखडा बनवण्याच काम करण्याचं कारण काय..?
कारण मुंबई ही काही दिल्लीसारखी केंद्रशासित नाहीये.तरीदेखील तिचा आराखडा निती आयोग,या केंद्राच्या संस्थेकडून करण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे.याचा अर्थ काय आहे..? तर याचा साधा सरळ अर्थ आहे की,मुंबईला “केंद्रशासित” करण्याची खेळी केंद्र करू पाहत आहे.यातून मुंबईच्या आर्थिक नाड्या हातात घ्यायच्या आणि त्याद्वारे मुंबई चे सर्व नियंत्रण मिळवायचे,असे मनसुबे स्पष्टपणे दिसून येत आहेत.
मुंबई या महाराष्ट्रात राहावी,यासाठी 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आहे.यासोबतच कित्येक नेते या आंदोलनात तुरुंगात गेले होते.आख्खा महाराष्ट्र,मुंबई साठी त्याकाळी लढला होता,आणि याचा परिणाम म्हणून,मुंबई महाराष्ट्रात राहिली आहे.आमची ही दुसरी पिढी,कोणत्याही परिस्थितीत,मुंबईला या राज्यापासून तोडू देणार नाही.भले आम्हाला जीव द्यावा लागला तरी बेहत्तर.
मुंबई ही या राज्याची आर्थिक राजधानी तर आहेच,संपूर्ण जगात या शहरामुळे आपल्या राज्याची एक अनन्यसाधारण ओळख आहे.ही ओळख पुसल्यास,संपूर्ण जगात मराठी माणसाची मान खाली जाईल,मराठी माणसाचा दबदबा कमी होईल,म्हणून हा लचके तोडण्याचा प्रकार केंद्र सरकार मुंबई सोबत करत आहे.परंतु आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत,तोपर्यंत या मायभुमिचे लचके तोडण्याच काम आम्ही कोणत्याही कोल्ह्यांना, लांडग्यांना आम्ही करू देणार नाही.
आतापर्यंत या राज्याचा इतिहास हा कायमच हिमालायच्या मदतीला जाणारा सह्याद्री अशी राहिली आहे.हा दैदिप्यमान इतिहास या राज्याचा असताना देखील,या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर हा निर्णय होत असताना,ते शांत बसून राहिले.उपमुख्यमंत्री देखील यावर शांत बसले.याचाच अर्थ या लोकांच्या संमतीने,या राज्याचे लचके तोडण्याच काम बिनबोभाट सुरू आहे.
तुम्ही जर केंद्र सरकारचे मिंधे नसतात तर ताठ मानेने,या निर्णयाचा जागेवर विरोध केला असतात.परंतु आपण सत्तेसाठी दिल्लीश्वरांना शरण गेला आहात.आणि त्यामुळेच तुम्ही एक शब्द या निर्णयाच्या विरोधात कधी शकला नाहीत. मला खात्री आहे की,या राज्यातील सामान्य माणूस,मराठी माणूस केंद्राच्या या मनसुब्याला कधीच यशस्वी होऊ देणार नाही.मग यासाठी पुन्हा एकदा,संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारावा लागला तरी बेहत्तर..!
या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले आणि मुंबई तोडण्याच स्वप्न देखील बघू नका असा इशारा राज्य सरकार तथा केंद्र सरकारला देण्यात आला.