अक्कलकुवा तहसीलदारांना भाजपाचे विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांचे लेखी निवेदन…


प्रकाश नाईक
नंदुरबार ब्युरो चीफ
मो.📱 9511655877

नंदुरबार :- दि. 30 ऑगस्ट अक्कलकुवा येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून अक्कलकुवा येथे नेत्रंग शेवाळी महामार्गावर बेमुदत रास्ता रोको व धरणे आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे अक्कलकुवा भाजपाचे विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी दिला आहेत.

सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराबाबत सातत्याने जनजागृती व वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे .अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी बऱ्याच दिवसांपासून मागणी तसेच तक्रार केली आहे की अक्कलकुवा ग्रामपंचायतच्या अनधिकृत ठेकेदारांनी जे काही विकास कामे दाखवून जो निधी संगणमताने काढलेला आहे. याबाबतीत शासनास दोन टक्के प्रमाणे जीएसटी व एक टक्के प्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरणा वसूल करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांची आहे. वेळोवेळी तक्रार अथवा मागणी करून सुद्धा संबंधित ग्राम विकास अधिकारी संबंधित ठेकेदारांकडून दोन टक्के प्रमाणे जीएसटी व एक टक्के प्रमाणे स्टॅम्प ड्युटी का वसूल करीत नाही? याबाबत अक्कलकुवा येथील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. 

तरी संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दोन टक्के प्रमाणे जीएसटी व एक टक्के प्रमाणे स्टॅम्प ड्युटी लेखा परीक्षणानुसार सर्व कागदपत्र यांच्या ताळमेळ असे 4/ सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत याबाबत योग्य ती कार्यवाही व वसुली न झाल्यास अक्कलकुवा तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर विधायक मार्गाने रस्ता रोको व धरणे आंदोलन करण्याचा इशारा अक्कलकुवा भारतीय जनता पार्टीचे विधान सभा क्षेत्र प्रमुख प्रमुख नागेश पाडवी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here