जव्हार एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयावर धडक मोर्चा
सुनिल जाबर
जव्हार प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय जव्हार याच्यावर दि.२८ पासून धडक मोर्चा काढण्यात आलेला असून धरणे आंदोलन चालू केले आहे. या धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस असूनही या मधून कोणताही तोडगा निघालेला नाही. प्रकल्पा अंतर्गत ज्या शाळांचे नियोजन केले होते त्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र ह्या शाळा बंद होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांनी वेळोवेळी पालघर कलेक्टर ऑफिस असेल किंवा जव्हार प्रकल्प कार्यालय असेल तसेच जव्हार तालुक्यातील अनेक युवा नेते, पक्षनेते, संघटनेचे कार्यकर्ते, यांना वेळोवेळी भेटून शाळेच्या मुलांविषयीच्या अनेक समस्या यासाठी अतोनात प्रयत्न केले परंतु त्यांची दखल कुठेही घेतलीगेली नाही.
शाळेतील मुलांविषयीचा प्रश्न मिटवण्यात यावा जेणेकरून मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी पालकांनी अनेक ठिकाणी फिरून आपल्या परीने खूप प्रयत्न केले परंतु त्याची दखल कुठे घेतली नाही. ज्या नामांकित शाळा बंद करण्यात आल्या आहेत यामुळे मुलांच शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे म्हणून लवकरात लवकर त्याशाळा चालू कराव्या आणि मुलांना त्यांच शाळेत शिक्षण द्यावे ह्या मागणी साठी विद्यार्थी व पालकांकडून दि.२८ रोजी मोठ्या जनसंख्येने जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात आला.