म्हसळा तालुका शालेय विद्यार्थ्यांचे सुरक्षेतेची दखल घेण्यासाठी श्री रविप्रभा मित्र संस्थेने शिक्षण प्रशासनाला दिले निवेदन

म्हसळा तालुका शालेय विद्यार्थ्यांचे सुरक्षेतेची दखल घेण्यासाठी श्री रविप्रभा मित्र संस्थेने शिक्षण प्रशासनाला दिले निवेदन

म्हसळा तालुका शालेय विद्यार्थ्यांचे सुरक्षेतेची दखल घेण्यासाठी श्री रविप्रभा मित्र संस्थेने शिक्षण प्रशासनाला दिले निवेदन

✍️ संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा:बदलापूरमध्ये बालिकेवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच देशात रोजच महिलांवर होत आसलेल्या अत्याचाराच्या बातम्या बघता तालुका ठिकाणी शिक्षण व्यवस्थेतील संबंधितांनी शालेय विद्यार्थ्यांचे सुरक्षेची वेळीच दखल घेतली पाहिजे या दृष्टीने म्हसळा तालुका श्री रविप्रभा मित्र संस्थेने शासनाचे निदर्शनात आणून पुढाकार घेतला आहे.श्री रविप्रभा मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,माजी सभापती रविंद्र लाड यांनी पंचायत समिती तालुका गट विकास अधिकारी माधव जाधव व गट शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे तालुका शिक्षण प्रशासनाने मुलींचे सुरक्षतेची वेळीच दखल घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन वजा निवेदन सादर केले आहे.निवेदनात त्यांनी शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या विशेष करून मुलींच्या सुरक्षतेची काळजी घ्यावी असे सुचित करताना म्हसळा तालुका ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुल १० ते १५ किमी अंतरावरून शहरात आणि ठिकठिकाणचे शाळा,महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी ये जा करतात त्या दृष्टीने शाळा,महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाची नेमणुक असणे,सी सी टिव्ही कॅमेरे,मुलींचे प्रसाधनगृहात महीला मदतनीस,आपत्कालीन सुरक्षा बेल,तक्रार पेटी,हेल्प लाईन नंबर आदी बाबींची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली आहे.यावेळी
गट विकास अधिकारी माधव जाधव यांच्याकडे सकारात्मक चर्चा करून निवेदन सादर करतांना अध्यक्ष रविंद्र लाड यांच्या समावेत तालुका प्रमुख सुरेश कुडेकर,समाज सेवक गणेश वाजे, सदस्य दत्ताशेठ लटके,संस्था सचिव संतोष उद्धरकर,खजिनदार सुशांत लाड, सदस्य समीर लांजेकर,बाळा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
————————————
आपण दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन तालुक्यातील सर्व शाळा, संस्था यांचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षक यांची मिटींग घेऊन लवकरच कार्यशाळाचे आयोजन करून या बाबतीत उपाय योजना आखण्यात येतील असे आस्वासन यावेळी देण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here