सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 30 ऑगस्ट
येथील सरदार पटेल महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रीडा दिवसानिमित्त शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे महाविद्यालयातील शांताराम पोटदुखे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. एम. काटकर हे होते. यावेळी विज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय वाढई, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बन्सोड, संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. बी. किशोर, वाणिज्य विभागाच्या डॉ. सपना वेगिनवार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. याच दिवशी १९०५ साली भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खेळाबाबत जागरूक राहण्यासोबतच त्यांना तंदुरुस्त राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार डॉ. कुलदीप आर. गोंड यांनी मानले. या कार्यक्रमात सत्र २०२१-२२ मध्ये खेळात उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचा महाविदयालयातर्फे ब्लेजर आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमासाठी हनुमंतू डंबारे सह शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here