एम डी.एन प्युचर स्कूल कोलाड तसेच कोलाड पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षिततेबद्दल रॅली,नटीकेतून विद्यार्थ्यांनी दिले सुरक्षेचे धडे

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

कोलाड :- एम.डी.एन फ्युचर स्कूल कोलाड व कोलाड पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने लहान मुले मुली विद्यार्थी यांचे सुरक्षिततेबाबत जनतेमध्ये जागृकता निर्माण व्हावी याकरिता कोलाड बाजारपेठेत रॅलीचे आयोजन करण्यात आले.
दिवसेंदिवस लहान मुली,महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले असुन, कोणतेही मुलगी व महिला सुरक्षित नाही.कोणी ही येतो त्रास देऊन जातो.मुलगी ही मुलांच्या खांद्याला खांदा लावून शिकते. वावरते.परंतु ती सुरक्षित नाही.यामुळे प्रत्येक मुलीला सर्व अन्यायाचा सामना करण्यासाठी शिवकालीन युद्ध कला, कराडे,बॉसिंग,या सारखे शिक्षण दिले पाहिजे.यामुळे मुली व महिलांची सुरक्षा कशा प्रकारे होईल हे नाटीकेच्या आधारे एम.डी.एन.स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर करून दाखवले.
यावेळी कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते,गोपनीय अंमलदार नरेश पाटील,पो.ह.मंगेश पाटील,शिद,सुखदेवे,मुंडे,पादीर,अमित पाटील,महिला पो.नागोठकर,तसेच कोलाड परिसरातील पोलिस पाटील मंजिरी कदम, समिदा दपके,स्नेहा जाधव, संजना खैर, कृतिका जाधव, संदीप बाईत,स्वामी महाराज तसेच असंख्य नागरिक तसेच एज्युकेटिव डायरेक्टर देवेंद्र चांदगावकर,मुख्यध्यापिका योगिनी देशमुख, मार्शल आर्ट शिक्षक अमर यादव,शिक्षक तितीक्षा जोशी,पुजा मॅडम, सायली भिंगे, आफ्रीन,अमरसिंग,राम जगदाळे,रुपाली दगडे व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. मुली,मुले, महिला यांच्या सुरक्षेतेबद्दल जनतेत जागृकता निर्माण व्हावी या उद्देशाने मुंबई गोवा हायवे वरील प्राथमिक आरोग्य केंद्र ते कोलाड रोहा रस्त्यावरील मराठा पॅलेस हॉटेल पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here