विहिरीला संरक्षण भिंत नसल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त महानगरपालिकेचे दुर्लक्ष

विहिरीला संरक्षण भिंत नसल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त महानगरपालिकेचे दुर्लक्ष

विहिरीला संरक्षण भिंत नसल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त महानगरपालिकेचे दुर्लक्ष

विशाल सुरवाडे
जळगाव ब्युरो चीफ
9595329191

जळगाव :- राजमालती नगर येथील महादेव व हनुमान मंदिरा ला लागून असलेल्या विहिरीला संरक्षण भिंत नसल्यामुळे दररोज तिथं कधी बकऱ्या तर कधी कुत्रे पडत असतात. दररोज परिसरातील नागरिक कसे तरी त्या जनावरांचे प्राण वाचवतात. दररोजच्या या गोष्टीमुळे तेथील नागरिक त्रस्त झाले आहे.
काही महिन्या अगोदर तर तिथं एक व्यक्ती पडला परंतु तेथील नागरिकांनी कसातरी त्याचा जीव वाचवला.
संरक्षण भिंत नसल्यामुळे त्या विहिरीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. आणि पावसाळ्यातील दिवस चालू आहे, त्या कचऱ्यामुळे तेथील पाणी दूषित झाले आहे, त्यामुळे रोगराईचा फैलाव होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने ते घातक ठरेल.
परिसरातील नागरिकांनी त्या विहिरीसाठी किती वेळा महानगरपालिकेला तक्रार अर्ज दिले आहे. तसेच कित्येक वेळा महानगरपालिकेतील अधिकारींना सुद्धा त्याबद्दल सांगण्यात आले आहे. परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई महानगरपालिकेमार्फत केलेली नसून तेथील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, आम्ही दररोज इथे पूजेसाठी येतो, आमच्या सोबत लहान लहान मुले असतात जर का एखादी वेळेस मुलगा तिथे पडला तर यासाठी जबरदस्त कोण असणार? असा जीव घेणा खेळ चालू आहे तरीसुद्धा महानगरपालिका यावर कारवाई का करत नाही असा तेथील नागरिकांचा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here