जुन्या पेन्शनसाठी आंदोलनाचा इशारा
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 9860020016
मूल – 2005 पूर्वीच्या अनुकंपा तत्वावरील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण अनुकंपा धारक एकवटले आहेत 24 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या भव्य राज्यस्तरीय सहविचार सभेत या कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी लढा देण्याचा निर्धार केला .या सभेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून कर्मचारी सहभागी झाले होते.या बैठकीत शासनाच्या नव्या शासन निर्णय नुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्यांची नावे अनुकंपा प्रतीक्षा सूचित होती.त्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी जोरकसपणे करण्यात आली.काही तांत्रिक कारणामुळे ज्यांना नियुक्ती मिळण्यास विलंब झाला.अशांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळालेला नाही
अनुकंपा संघर्ष. समितीने या मागणीसाठी कंबर कसली असून राज्यभर जनजागृती सभांचे आयोजन केले जात आहे.मुख्यमंत्री तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन दिले जात आहे.जर शासनाने या मागणीची दखल घेतली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे.या सहविचार सभेत अनुकंपा संघर्ष समितीचे वतीने गुरुदास गुरनुले जिल्हा समन्वयक कोषागार विभाग चंद्रपूर मिलिंद धोगळे (जलसंपदा विभाग नागपूर) संजय सोनार हरीश मांडले राकेश माहूरकर नितीन साखरे विरेंद्र पिल्लेवान गजानन बोरकुटे इतर बहुसंख्येने अनुकंपा धारक बांधव सहभागी झाले होते