कारंजा विज वितरण कंपनी चा भोगळ कारभार.
◆अतिरिक्त बिल देवून जनतेची लूट
◆सैनिकालाच पंच्याहत्तर हजार बिल
◆जनतेची लूट न थाबविल्यास बंजारा क्रांती करनार आंदोलन
भुषण कावडे प्रतिनिधी
कारंजा:- विज वितरण कंपनीच्या भोगळ कारभाराला शहरासह तालुक्यातील जनता हैराण झाली असून अतिरिक्त विज बिल देवून अक्षरशः जनतेची लूट चालू असून थकित बिलाच्या नावाने अव्वाच्या सव्वा विज बिल देवून नाहक आर्थिक पिळवणूक कारंजा विज वितरण कंपनीने चालू केले असून शिंदे नगर येथील मनोज प्रकाश जाधव या सिमा सुरक्षा बलातील जवानाला ७५९७० रुपयाचा अतिरिक्त विज बिल देवून त्रास देण्याचा प्रकार चालू आहे. याबाबत सदर सुरक्षा रक्षकानी हि बाब बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशचे युवा तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांना आपबिती सागीतली तेव्हा अनिल जाधव यांनी कंपनीच्या उपविभागिय अभियंता यांना निवेदन देवून अतिरिक्त विज देवून जनतेची लूट न थाबविल्यास आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनानूसार आधीच कोरोना या महामारीने आदिच जनता हैराण असून लाँकडाऊनने सामान्य लोकाचे रोजगार कायमस्वरूपी बंद पडले असून गोर गरिबाना चूल पेटविन्याची मोठी समस्या निर्माण झाली असतानाच दुसरीकडे कारंजा विज वितरण कंपनी अतिरिक्त विज बिल देवून नाहाक त्रास देण्याचा आडमुटी धोरन आवलंबवून शहरासह तालुक्यातील जनतेची अक्षरशः दिवसढवळ्या डाका टाकण्याचा प्रकार करित असून आठ दिवसात विज विल दुरुस्ती करण्याचा उपक्रम न राबविल्यास बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशचे युवा विदर्भ प्रमुख राजू नाईक, युवा तालुका अनिल चव्हाण, मनोज जाधव, गणपत पवार आदीच्या स्वाक्षरीने निवेदन देवून मागणी केली आहे