आंजी(मो.) या गावातील २३ कुटुंबाचे पुनर्वसन करून कायमस्वरूपी मालकी पट्टे प्रदान करा.
समता सैनिक दलाची मा.मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी
समता सैनिक दलाची मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रशांत जगताप
वर्धा:- आंजी या गावातील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या जागेवर राहणाऱ्या कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना कायमस्वरूपी मालकी पट्टे प्रदान करण्यात यावे अशी मागणी समता सैनिक दलाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.
आंजी(मो.) या गावातील नागरिक जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेकरीता असलेल्या जागेवर निवासी उपयोगातकरीता अतिक्रमण करणाऱ्या २३ कुटुंबाच्या झोपडीवजा घरांना शासन आणि प्रशासनाने संगणमत करून उध्वस्त केले आणि त्यांना बेघर करून त्यांचे कुटुंब उघड्यावर आणले.ही बाब निश्चितच निंदनीय असून त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. करीता समता सैनिक दल वर्धा जिल्ह्याच्या वतीने आपणास निवेदन करतो की,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी सदर बाबीची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी.
वास्तविकत: महाराष्ट्र शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र.एलईएन१०९९/प्र.क्र.२७/ज-१दि. २८/०९/१९९९ नुसार अतिक्रमित झोपडपट्टी भोगवटदारांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाने बेघर करण्यात आलेल्या पिढीतांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांचे पुनर्वसन करून त्यांना कायमस्वरुपी मालकी पट्टे प्रदान करण्यात यावे अशी मागणी समता सैनिक दल वर्धा युनिटच्या वतीने निवेदनातून करण्यात आली.
यावेळी निवेदन देतांना समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मार्शल रमेश निमसडकर, जिल्हा संघटक अभय कुंभारे, सह-संघटक स्वप्नील कांबळे,जिल्हा समन्वयक गौतम देशभ्रतार, जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत,मार्शल विकेश वानखेडे, मार्शल नुरूल तडसे,मार्शल वैभव इंगोले,मार्शल अरविंद मून, मार्शल गोपाल महाजन,मधुर येसनकर,नारायण मून,मिलिंद मून,मुख्याध्यापक अनिल खडतकर,सुनील बाभळे, मनोज थुल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.