पाण्याचा वापर काटकरीने करणे गरजेचे सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील बोथे
विनायक सुर्वे प्रतिनिधी
शेलुबाजार :- सद्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे सर्व यंत्रणा ह्या या कोरोना विषाणूला हटविण्यासाठी कार्य करीत आहेत. यामुळे विविध विभागाचे कामकाज देखील ठप्प असल्याने याचा परिणाम जिवनमानावर झालेला दिसून येत आहे. अश्यातच पाणी टंचाई देखील या उन्हाळ्याच्या दिवसात अनेक गावांमध्ये उग्र रूप धारण करत आहे .पण सद्या सर्वत्र कोरोनाचाच विषय असल्याने या पाणी टंचाईकडे, असलेल्या मुबलक पाण्याकडे , आपण वापरत असलेल्या अति वापराकडे साफ दुर्लक्ष होतं आहे म्हणून तमाम जनतेनी पाण्याचा वापर आहे त्या पाण्यातच काटकसरीणे करावा असे भावनिक आवाहन गोगरी येथील जल दूत युवा लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश नारायणराव बोथे यांनी केले आहे .पाण्याचा वापर या बिकट परिस्थितीत योग्य करावा ,जेवढे पाणी लागेल तेवढाच वापर करावा ,पाणी भरून झाल्यावर नळाची तोटी बंद करुन ठेवावी ,पाण्याची नासाडी करू नका पाणी निर्माण न होणारी बाब असल्याने आहे त्याच पाण्याचा वापर जपुन करणे काळाची गरज असल्याचे मत देखील गणेश बोथे यांनी व्यक्त केले आहे