अमरावती जिल्हातील दाणापुरच्या 100 दलित नागरिकांनी गाव सोडल.

91

अमरावती जिल्हातील दाणापुरच्या 100 दलित नागरिकांनी गाव सोडल.

● 100 दलित नागरिकांनी गाव सोडताच प्रशासनाला आली जाग, दाणापुरच्या घटनेची अनुसूचित जाती आयोगाकडून दखल.
● महाराष्ट्रात जाती वादी मानसिकता वाढते?

✒प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज
📲9766445348
अमरावती:- फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंकीत करणारी संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे तालुक्यातील दानापूर येथे समोर आली आहे. दाणापूर गावातील सवर्ण जातीवादी मानसिकतेतुन अनुसूचित जातीच्या नागरीकाना शेतीचा वहीवाटीचा रस्ता अडवून एका वृद्ध शेतकरी महिलेची सोयाबीन गंजी पेटवून दिली होती. सतत येथील सर्वांकडून अत्याचार होत असल्याने कंटाळून गावातील 100 दलितांनी गाव सोडून पाझर तलावाजवळ उघड्यावर राहायला गेले होते. त्यामूळे संपुर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सवर्ण जातीवादी लोकांच्या अत्याचाराच्या घटनेची चर्चा राज्यात पसरल्यामुळे याची दखल थेट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने घेतली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी व जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा पोलीस निरीक्षक अविनाश बारगळ यांनी दाणापूर गावात जाऊन पीडितांची भेट घेतली. जिल्हा प्रशासना सोबत बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली.

यात तातडीने घटनेची सर्व सखोल चौकशी करून अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला सादर करण्याचे निर्देश आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिले. दरम्यान, यातील 2 आरोपींना अटक केली असून पीडित कुटुंबाना तातडीने नुकसान भरपाईसुद्धा देण्यात आल्याची माहिती अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिली. इतकंच नाहीतर गावात सलोख्याचे वातावरण रहावे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.