भारतीय लोकसत्ताक संघटना’ आणि ‘भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचा’शासनास सल्ला शालेय शिक्षण मंत्री यांनी परिपत्रक काढावे,सर्व आंदोलन स्थगिती करण्यात येतील..

48

भारतीय लोकसत्ताक संघटना’ आणि ‘भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचा’शासनास सल्ला शालेय शिक्षण मंत्री यांनी परिपत्रक काढावे,सर्व आंदोलन स्थगिती करण्यात येतील..

भारतीय लोकसत्ताक संघटना' आणि 'भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचा'शासनास सल्ला शालेय शिक्षण मंत्री यांनी परिपत्रक काढावे,सर्व आंदोलन स्थगिती करण्यात येतील..

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी लढणारी ‘भारतीय लोकसत्ताक संघटना’ आणि ‘भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाच्या वतीने शिक्षण मंत्री यांना आव्हान करण्यात आले की २० व २० पेक्षा कमी पट संख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत तसेच नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही. असे परिपत्रक शाळेय शिक्षण मंत्री यांनी काढावे, सर्व आंदोलने स्थगित करण्यात येतील.

मुंबई- काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमाशी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा बंद करत आहे, असे आंदोलन करत काही संघटना अफवा पसरवत आहे असे वक्तव्य केले होते. या प्रश्नाचे उत्तर म्हणून भारतीय लोकसत्ताक संघटना व भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाच्यावतीने शासनाला आव्हान केले की महाराष्ट्र शासनाने २० व २० पेक्षा कमी पट संख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत तसेच नवीन शैक्षणीक धोरण महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही. असे परिपत्रक शाळेय शिक्षण मंत्री यांनी काढावे. असे परिपत्रक निघताच सर्व आंदोलने स्थगित करण्यात येतील.

हजारो शाळा बंद करण्याऱ्या निर्णयाचे निषेध आंदोलन व जनजागृती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संघटन करत आहे,हे जर शासनाला जनजागृती व आंदोलन अफवा पसरवून लोकांची गैरसमज करत आहे असे आपले मत आहे तर आमचे संघटनेच्यावतीने प्रश्न आहे,आम्ही अफवा करतअसे शासनाला जाणीव होत असेल तर शासनाने परिपत्रक काढून जनतेशी जनजागृती करावी कोण खोटे बोलत आहे हे जनतेच्या लक्षात येईल असे मत व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या शासकीय शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल १७००० शाळा बंद होऊ शकतात,ज्यामुळे ३,४०,००० विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा तसेच शिक्षकांच्या रोजगाराचा प्रश्न उदभवणार आहे.नागरिकांच्या करातून सुरू असलेल्या शासकीय शाळा ज्यात हजारो गरीब,वंचित समुदायातील, गावं खेड्यातील, आदिवासी पाड्यातील असंख्य विद्यार्थी शिकतात त्या शासकीय शाळा महाराष्ट्र सरकार बंद करत आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ यांच्या वतीने गोवंडी या ठिकाणी चौक सभा शनिवार २९/१०/२०२२ रोजी सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत घेण्यात आली.

भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाच्या वतीने शासनाने या मागण्या मान्य कराव्या
………………………….……………………

१)शिक्षण हा आमचा अधिकार आहे आणि आम्हला मिळालाच पाहिजे.

२)शासनाने ज्या शाळा बंद करायचे ठरविले आहे त्या शाळा बंध करण्यात येऊ नये.

३)Kg to pg पर्यंतचे शिक्षण हे मोफत ,सक्तीचे आणि एक समान दर्जेदार मिळालेच पाहिजे.

४)शिक्षण देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे .

५)शिक्षणाचा बजेट एकूण बजेटच्या २० टक्के करण्यात यावा.

६)शासनाच्या सर्व शाळांचा दर्जा सुधारून एकसमान व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू राहिल्याच पाहिजे.
……….………………………………………

शासनाने आमच्या या मागण्या मान्य केल्या नाही तर मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी निषेध
चौक सभा घेऊ असे संघटनेच्या वतीने वक्तव्य करण्यात आले, त्याचबरोबर आरोग्य, रोजगार व शिक्षण याविषयी लोकांना जनजागृती करण्यात आली.

सदर चौक सभेला सामाजिक कार्यकर्ते , अमोलकुमार बोधिराज – अध्यक्ष (भारतीय लोकसत्ताक संघटना), दीपिका आग्रे – उपाध्यक्ष (भा.लो.सं.), विशाल गायकवाड – अध्यक्ष (भारतीय लोकसत्ताक बेरोजगार महासंघ), मनिष जाधव – अध्यक्ष (भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ), किरण गमरे – सरचिटणीस (भारतीय लोकसत्ताक बेरोजगार महासंघ), सुप्रिया मोहिते – उपाध्यक्ष (भा.लो.वि.सं.), प्रेमसागर बागडे – उपाध्यक्ष (भा.लो.वि.सं.), अश्विनी पवडमन – मुंबई अध्यक्ष (भा.लो.वि.सं.), योगेश कांबळे – मुंबई सचिव (भा.लो.वि.सं.), सनी कांबळे,संदिप आंग्रे, मंगेश खरात, नितीन सातपुते, किशोर येडे,आनंद नवतुरे,अतुल म्हस्के, सोहिल ओव्हाळ, सुबोध जाधव,सुनिल येडे,राकेश गडबडे, रामेश्वर सातपुते,आकाश येडे,सुहास कारंडे,यश लोखंडे, रोहन साळवे,मधुकर जी.कांबळे,नितुजी वाघमारे, संदीप बनकर, रत्नाताई संदीप बनकर,अजय खरात, सनीजी मोरे,महादेव घुगे,मेहबूब भाई,इस्माईल भाई,शफीक भाई,विकास चांदनशिवे,मनिष गायकवाड, शरीफ भाई,कमलेश मोहिते, अभिषेक कासे, अतुल मोहिते,अक्षय जाधव, योगेश ओवळे, संतोष महाडिक, सागर गायकवाड, नितेश मोरे आणि ताहीर शेख तसेच सगळे कार्यकर्ते सभासद आणि गोवंडी मधील लहान मुलं ही इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.