कुंभार समाजातील विद्यार्थी गुणवत्तेची खाण-खा. नवनीत राणा विदर्भ कुंभार समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

55
कुंभार समाजातील विद्यार्थी गुणवत्तेची खाण-खा. नवनीत राणा विदर्भ कुंभार समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कुंभार समाजातील विद्यार्थी गुणवत्तेची खाण-खा. नवनीत राणा
विदर्भ कुंभार समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कुंभार समाजातील विद्यार्थी गुणवत्तेची खाण-खा. नवनीत राणा विदर्भ कुंभार समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
✒️ देवेंद्र भगत✒️
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
📱8275348920

अमरावती – (दि. 31.10.2023)
कलेचा उपासक कुंभार समाजातील विद्यार्थी गुणवान, हुशार व मेहनती असून कुंभार समाजातील विद्यार्थी गुणवत्तेची खाण असल्याचे प्रतिपादन अमरावतीच्या लोकप्रिय खासदार सौ. नवनीत राणा यांनी केले. त्यांच्या हस्ते कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे गौरव प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी संबोधित करतांना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विदर्भ कुंभार विकास समिती अमरावतीचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडोकार, सचिव श्री सुरेंद्र सरोदे, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ओबीसी महामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री संजय गाते, विजयकुमार सोनोने, भगवान सूर्यवंशी, बबनराव जगदाळे, रमेशराव तांबट, समाजोन्नती समितीचे अध्यक्ष श्री पंजाबराव काकडे, सचिव डॉ. श्रीराम कोल्हे, महिला अध्यक्ष श्रीमती प्रभाताई भागवत, गोरोबा काका नागरी सह.पत संस्थेचे अध्यक्ष श्री भगवान जामकर, प्रा. सुरेश नांदुरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
खा. राणा पुढे म्हणाल्या, कुंभार समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबध्द आहे. समाजमंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर लवकरच भव्य प्रवेशव्दाराच्या बांधकामाला सुरुवात होणार असून समाजभवनाच्या बांधकामासाठी निधी सुध्दा उपलब्ध करुन देणार असल्याचे आ·ाासन त्यांनी याप्रसंगी दिले. अमरावती जिल्ह्राच्या विकासासाठी कटिबध्द असून अनेक विकासात्मक कामे केल्याचे सांगून त्यांनी गुणवंत विद्यार्थांना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्यात.
कुंभार समाजाचा आमदार व्हावा-संजय गाते
भाजपा ओबीसी महामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते म्हणाले, कुंभार समाज एकजूट झालेला आहे. समाजाच्या अनेक समस्या आहेत. शासन स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहो. वि·ाकर्मा योजनेचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा असे आवाहन करुन कुंभार समाजामधून आमदार स्वरुपी नेतृत्व मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
समाजभूषण व समाजगौरव पुरस्कार वितरित
भाजपा ओबीसी महामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री संजय गाते यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन, तर कु.ंसरिता पुनासे, डॉ. प्रवीण खोपे, श्रीमती कांचनताई मानकर, डॉ. चैताली मेहरे, प्रा. दिलीप आप्तुरकर,श्री के.एन. मोरे, श्री हरिचंद्र चिल्लोर, श्री भगवान सूर्यवंशी, शुभम काओकार, यशवंत खोपे, सौ. संगिता जगदाळे, कु. प्रतिभा चांदुरकर, डॉ. मनिष अप्तूरकर, डॉ. सविता म. अप्तूरकर व डॉ. पलाश भातकुलकर यांचा समाजगौरव पुरस्कार, शॉल, श्रीफळ, गौरवप्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे व विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे अध्यक्ष श्री सुधाकर शेंडोकार यांनी कुंभार समाजाच्या वेदना व मागण्या मा. खासदार सौ.नवनित ताई राणा यांचे समोर मांडल्या व कुंभार समाजाच्या विकास व्हावा अशी विनंतीवजा अपेक्षा व्यक्त केली.सोबतच श्री संत गोरोबा काका प्रवेशव्दाराची समाजाची मागणी येत्या काही काळात पूर्ण होवू घातली आहे याबद्दल मा.आ.रविभाऊ राणा व मा.खासदार सौ.नवनित ताई राणा यांचे आभार मानले.श्री.संत गोरोबा भवनाच्या वरच्या मजल्याच्या बांधकामासाठी विकासनिधी मिळावा ही देखील विनंती करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेंद्र सरोदे, संचालन प्रा. सुरेश नांदुरकर व डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार अॅड. गजानन तांबटकर यांनी मानले. कार्यक्रमाला सतिश गावंडे, मधुकर खांडेकर,सुनिल भागवत, विलास धामणकर, विनायकराव तायडे,नंदकिशोर नांदुरकर, नंदुभाऊ काळकर, रमेशराव अ.अंबुलकर युवक अध्यक्ष रमेश ह.अंबुलकर, शंकरराव धामणकर, मोहनराव नांदुरकर, गजानन वडुरकर, रुपराव खोपे, सौ. निर्मला नांदुरकर, राजेंद्र भागवत, विनोद मेहरे,श्रीमती प्रभाताई भागवत, यांच्यासह कुंभार समाजातील गणमान्य नागरिक, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.