१९१पेण मतदान संघात अपक्ष उमेदवार विश्वास बागुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, कुणबी फॅक्टर ठरणार महत्वाचा

१९१पेण मतदान संघात अपक्ष उमेदवार विश्वास बागुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, कुणबी फॅक्टर ठरणार महत्वाचा

१९१पेण मतदान संघात अपक्ष उमेदवार विश्वास बागुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, कुणबी फॅक्टर ठरणार महत्वाचा

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

कोलाड :- १९१ पेण विधानसभा मतदान संघात कोलाड विभागातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास मधुकर बागुल यांनी मंगळवार दि.२९ ऑक्टोबर २०२४ रोजी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी चेतन परबळकर, विकास महाबळे, विकास बागुल उपस्थित होते.यामुळे कोलाड विभागात असणारा कुणबी फॅक्टर महत्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण ७ विधानसभा मतदार संघात एकूण १११ उमेदवारांचे १४० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले आहे. यामध्ये पेण १९१ मतदान संघात १५ उमेदवारांचे १९ अर्ज दाखल झाले असुन यामध्ये कोलाड परिसरातील वरसगांव येथील कुणबी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते विश्वास मधुकर बागुल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
वडखल पेण उड्डाण पुलावरून जाणाऱ्या एसटी बसमुळे प्रवाश्यांची होणारी गैरसोय निर्माण झाली होती त्या एसटी बस ब्रिज खालून जाण्यासाठी पेण एसटी कार्यालयात अर्ज करुन प्रवाश्यांची गैरसोय दूर केली होती. याशिवाय शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांचे नाव पाली-खोपोली महामार्गाला देण्यात यावा,विळा-भिरा रस्त्यावरील ट्रेलरच्या वाहतूकी प्रवाश्यांच्या जिवाला धोका,सुधागड तालुका अजून ही विकासापासून वंचित अशा असंख्य समस्याविषयी विश्वास बागुल यांनी न्यूज पेपर मधून आवाज उठवला होता यामुळे या मतदान संघात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रतिक्रिया
एकूण उमेदवारांनी अर्ज दाखल केल्या नंतर असे लक्षात आले आहे की प्रत्येक मतदान संघात विविध पक्षाकडून तेच तेच उमेदवार देण्यात आले असुन नवीन उमेदवारांना संधी मिळणार तरी केव्हा? यामुळे नाराजी व्यक्त करीत अनेकांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरले आहेत.यामुळे परिणाम काय ही होवो?खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होऊन कोण निवडून येणार हे सांगणे कठीण झाले आहे.
विश्वास मधुकर बागुल
विधानसभा उमेदवार वरसगांव (कोलाड )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here