सोमय्या पॉलीटेक्नीक येथे पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 30 ऑक्टोंबर
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विद्यार्थ्यांसाठी संगणक विभागातर्फे पोस्टर मेकिंग प्रदर्शनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संगणक विभाग,इलेक्ट्रिकल, सिव्हिल,मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स टेलीकॉम्युनिकेशन,मायनिंग आदी विभागातून विद्यार्थ्यांनी टेक्निकल जागृती अभियान अंतर्गत पोस्टर प्रदर्शनी स्पर्धेत सहभाग घेतला.
पोस्टर हे मोजक्या शब्दात चित्र-आलेख यांच्या सहाय्याने योग्य तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणारे एक साधन आहे. चित्रकला-रंगसंगती यांचा आविष्कार, सुसंवादी भाषेची जाण आणि संबंधित विषयातील नेमकी व अचूक माहिती यांचा संगम पोस्टर मध्ये दिसून येतो.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक संगनक विभागातील – नयन दास,तुषार चिवंडे, द्वितीय पारितोषिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स टेलीकॉम्युनिकेशन विभागातील – कहकषा शेख, तृतीय पारितोषिक मेकॅनिकल विभागातील – राज घटे, योगेश निशाद यांना उपप्रचार्य जमीर शेख यांच्या हस्ते बक्षिसे,पुष्पगुछ आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थापक पी.एस.आंबटकर ,डायरेक्टर अंकिता आंबटकर यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले. तसेच या स्पर्धेचा यशस्वीतेसाठी संगनक विभागातील विभागप्रमुख प्रा.सोनम रेवतकर,प्रा.राजेश्री पाटील,प्रा.सरोज पाचभाई ,प्रा.प्रविनी देवतळे, प्रा.दीपक मस्के, प्रा.अनिल खुजे ,नितीन प्रा.डॉ.नितीन चव्हाण तसेच परीक्षक म्हणून प्रा. दीपक नगराळे, प्रा.भारत बाबरे,प्रा.कमलेश ठाकरे हे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here