भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्व.इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

95

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्व.इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096976

शासनाच्या व भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मा.प्रशासक तथा आयुक्त यांच्या निर्देशानुसार मा.उप-आयुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे व लेखा व वित्त अधिकारी श्री, रामप्रसाद सोलुंके यांच्या शुभहस्ते स्व.इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम नवीन प्रशासकिय इमारतीमधील तळ मजल्यावर संपन्न झाला. तदनंतर आय.जी.एम. हॉस्पीटल येथील स्व.इंदिरा गांधी यांच्या अर्ध पुतळ्यास प्रभाग समिती क्रमांक १ सहाय्यक आयुक्त श्री.मकसूम शेख व कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कोकणी यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मृतीस त्यांना अभिवादन करण्यांत आले. तसेच
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून राष्ट्राच्या एकता, अखंडता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी स्वतःस समर्पित करीत देशाच्या आंतरीक सुरक्षा सुनिश्चित करण्याचे योगदान सत्यनिष्ठेनुसार संकल्प करण्याबाबत मा.उप-आयुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचन करुन शपथ घेण्यात आली. या प्रसंगी शहर अभियंता श्री. जमिल पटेल, करमुल्यांकन अधिकारी श्री. सुधीर गुरव, आथापना विभाग प्रमुख, जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी, श्रीम.दिपीका ठाकरे, शहर विकास अधिकारी समीर जवरे, वाहन व्यवस्थापक प्रशांत संख्ये, बारनिशी विभाग प्रमुख सुरेखा पावडे व इतर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.