नागपूर लग्न समारंभात चाकूने वार करून आचाऱ्याची हत्या.

60

नागपूर लग्न समारंभात चाकूने वार करून आचाऱ्याची हत्या.

हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉन आहे. या ठिकाणी एक लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. लग्न समारंभ संपत असतानाच स्वयंपाक करणारा आचारी आणि केटरिंगचं काम करणारे यांच्यात पैशांवरून वाद झाला. आरोपीने चाकूने आचाऱ्याची हत्या केली.

युवराज मेश्राम

नागपूर :- नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत एका लग्न समारंभात गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉन आहे. या ठिकाणी एक लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. लग्न समारंभ संपत असतानाच स्वयंपाक करणारा आचारी आणि केटरिंगचं काम करणारे यांच्यात पैशांवरून वाद झाला.आहे. पैश्याच्या वादावरून ही हत्या झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. भर कार्यक्रमात अशा प्रकार खून झाल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपीना अटक केली आहे.

नागपूरच्या हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉन आहे. या ठिकाणी एक लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. लग्न समारंभ संपत असतानाच स्वयंपाक करणारा आचारी आणि केटरिंगचं काम करणारे यांच्यात पैशांवरून वाद झाला. वेगवेगळ्या ठिकाणी यांनी सोबत काम केलं होतं. त्या पैश्याचा यांचा हिशोब बाकी होता. काही वेळाने वाद एवढा वाढला की आरोपीने चाकूने आचाऱ्याची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश मिश्रा असं हत्या झालेल्या आचाऱ्याचं नाव आहे. या हत्येवेळी मृतक अखिलेश मिश्रा आणि त्याचा भाऊ दोघांवरही वार करण्यात आले. अखिलेश मिश्रा यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं. तर त्याचा भाऊ जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अखिशेल याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींचीही चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.