नेहरु युवा केंद्राचे वतीने जिलास्तरीय युवा संसद 2021 चे आयोजन.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
वर्धा :- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र वर्धा द्वारा जिल्हास्तरीय युवा ससंद Dist Youth Parliament सन 2020-21 चे आयोजन दि. 29/12/2020 रोजी न्यु आर्ट, कॉमर्स व सायन्स कॉलेज वर्धा येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन न्यु आर्ट कॉलेजचे प्राचार्य आशिष ससनकर, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रचार मंत्री एवं बालभारती पाठपुस्तक निर्मीती मंडळाचे निमत्रंक डॉ हेमचंद्र वैद्य, नि. जिला युवा अधिकारी संजय माटे, नेहरु युवा केद्राचे जिला युवा अधिकारी श्री शिवधन शर्मा, राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रा. मिसाळ हयांनी दिपप्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करुन केले हयावेळी भारत सरकारच्या जल शक्ती अभियानाचे जिलास्तरीय उदघाटन वृक्षांना पाणी देवून व भेट देवून करण्यात आले हया उपक्रमास मा. पंकजजी भोयर, आमदार वर्धा हयांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिला युवा अधिकारी श्री शिवधन शर्मा हयांनी केले.
जिल्हा युवा संसद आयोजनांत जिल्हयातून सेवाग्राम येथील कु. आयुषी चव्हाण हिने प्रथम क्रंमाक प्राप्त केला तर द्वितिय क्रंमाक आष्टी येथील दर्शन तेलहांडे, तृतिय क्रंमाक प्रितम जांभुळकर तर उत्तेनार्थ प्राजक्ता कांबळे हयांनी मिळवला हया संसदेचे परीक्षक म्हणुन म.रा. अंधश्रध्दा निमुलन समितीचे महाराष्ट्र निमत्रंक श्री पंकज वंजारे, नि. जिला युवा अधिकारी श्री संजय माटे, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रचार मंत्री एवं बालभारती पाठपुस्तक निर्मीती मंडळाचे निमत्रंक डॉ हेमचंद्र वैद्य,, इंग्रजीचे विषयाच्या प्राध्यापिका भक्ती नातु, प्राध्यापिका डॉ रत्ना चौधरी हयांनी काम पाहीले. सदर विजेते राज्य स्तरावरुन राष्ट्रीय स्तरावर जाणार असुन संसद भवन दिल्ली येथे दि 12 व 13 जानेवारी 2020 रोजी कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर 2 लाख, 1.5 लाख व एक लाख या प्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी ढोले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समन्वयक श्री मेघश्याम ढाकरे हयांनी केले कार्यक्रमास प्रियदर्शिनी महाविद्यालयाचे डॉ धंनजय सोनटक्के नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम संयोजक दयाराम रामटेके, स्वयंसेवक जयश्री भोयर, दिक्षांत टेंभरे, अमेाल चावरे व अन्य स्वंयसेवक उपस्थित होते.