मुंबईत सासऱ्याने आंतरजातीय विवाह केल्यामुळे सुनेची केली हत्या. 

65

मुंबईत सासऱ्याने आंतरजातीय विवाह केल्यामुळे सुनेची केली हत्या. 

हिरामण गोरेगावकर प्रतीनिधी

मुंबई :- मुंबईत आंतरजातीय विवाह केल्यामुळेगुन्ह्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांदिवली परिसरात सासऱ्याने आंतरजातीय विवाह केल्यामुळे सुनेची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर महिलेचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मुलाशी आंतरजातीय विवाह केल्यामुळे सासऱ्याचा सुनेवर राग होता. याच रागातून सासऱ्याने सुनेची हत्या केली. समतानागर पोलीस स्टेशनमध्ये 11 डिसेंबर रोजी 22 वर्षीय नंदिनी राय बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांकडून या घटनेची चौकशी करण्यात येत होती. यावेळी मालवणी पोलिसांच्या हद्दीतील कुजलेल्या अवस्थेत 24 डिसेंबर रोजी महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला असता महिलेच्या वडिलांनी मृतदेहाची ओळ्ख पटवली आणि संपूर्ण प्रकाराचा खुलासा झाला. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास करत आरोपी सासरा कमळ राय 55 वर्ष, त्याचा साथीदार कृष्णा सिंग 45 वर्ष आणणि प्रमोद गुप्ता अशा तिघांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमळ आणि त्याच्या दोन साथीदारांनी एकत्र येत नंदिनीची हत्या केली. त्यानंतर रात्रीच्या वेळी रिक्षातून बोरिवली पश्चिम इथल्या एका नाल्यात तिचा मृतदेह फेकून दिला होता. आरोपींच्या या माहितीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती समतानागर पोलिसांनी दिली आहे.