काँग्रेसच्या माजी आमदाराच्या निधनानंतर तासाभरात पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर दिला मुखाग्नी.

57

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या निधनानंतर तासाभरात पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर दिला मुखाग्नी.

बिहार:- एकमेकांच्या सोबतीने जीवन जगत असताना अचानक पतीने साथ सोडली. आपल्या जीवनसाथीने साथ सोडल्याचे कळताच काही वेळाने पत्नीनेही प्राण सोडले. बिहारच्या गोपाळगंज भागात घडलेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली.

काँग्रेसचे माजी आमदार राजनंदन राय वय – 85 यांना श्वास घेण्यास अडचण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री निधन झाले. पतीच्या निधनाची वार्ता कळताच पत्नी श्रद्धा देवी यांनीही काही तासांतच प्राण सोडला. या ‘अमर प्रेमा’ची चर्चा सध्या बिहारमध्ये सुरू आहे. राजनंदन राय यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याबाबत माहिती देताना सांगितले की, 1969 मध्ये सोनबरसा विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले होते आणि आमदारकी जिंकली होती. शांत स्वभावाचे राजनंदन हे मुहम्मदपूर पोलीस स्थानक भागातील महाराणी पनडुही टोला येथे बऱ्याच काळापासून राहात होते. पत्नीवर त्यांचा खूप जीव होता आणि ते बाहेर जाताना तिला घेऊनच जात होते. अखेर मृत्यूनंतरही त्यांची साथ सुटली नाही.

एकाच चितेवर दिली अग्नी

दरम्यान, गावच्या प्रमुखाने राजनंदन राय यांच्या निधनाची माहिती त्यांच्या पत्नीला दिली. यावेळी राजनंदन यांचा मुलगा बाबू प्रसाद यादवही उपस्थित होता. पतीच्या निधनाची वार्ता ऐकताच पत्नी श्रद्धा देवी यांचीही तब्येत बिघडली आणि दोन तासांत त्यांचाही मृत्यू झाला. दोघांनाही नारायणी नदीजवळील महाराणी घाटावर एकाच चितेवर अग्नी देण्यात आली.