doctor-saves-lives-of-two-month-old-in-mumbai
दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करून लहानग्याला जीवनदान देणारे डॉ. कल्याण मुंडे.

 

doctor-saves-lives-of-two-month-old-in-mumbai
दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करून लहानग्याला जीवनदान देणारे डॉ. कल्याण मुंडे.

सिद्धांत
३१ डिसेंबर २०२१: कर्नाटकच्या गुलबर्गा येथील रहिवासी आणि मुंबईत रोजगारासाठी आलेल्या राहुल राठोड यांच्या दोन महिन्याच्या लहान मुलाला श्वास घेण्यास त्रास आणि पुरेशी झोप येत नसल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर त्यांनी गुलबर्गा येथील रुग्णालयात या बाळाच्या चाचण्या केल्या त्यावेळी या बाळाच्या हृदयाला ६ मि.मि. आकाराचे छिद्र असल्याचे निदर्शनास आले.

काही डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर हृदयाचा आकार लहान असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यास अडचण असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर राठोड यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन जे. जे. रुग्णालयाच्या कॉर्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मुंडे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. कल्याण मुंडे यांनी खुली शस्त्रक्रिया न करता त्यांनी ट्रान्सकॅथेटर प्रक्रियेद्वारे ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली, शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून बाळाचा आहार आणि झोप व्यवस्थित होत असल्याचे दिसून आले आहे.

भारतामध्येच अश्या प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टर मुंडेंच्या मते अश्या केसेसमध्ये बाळाचे वय आणि वजन वाढल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाते. परंतु राठोड यांच्या  बाळाला श्वास घेण्यात आणि दूध पिण्यात गंभीर त्रास होत होता. त्यामुळे (VCD) डिव्हाईस क्लोझेर प्रक्रियेद्वारे बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कर्नाटक मध्ये राहणाऱ्या राठोड कुटुंबीय कित्येक हॉस्पिटल पालथी घालून उपचार न मिळाल्यानंतर अखेर जे.जे. रुग्णालयामध्ये पोहचले होते. इथे बाळावर यश्वस्वी उपचार झालाच तसेच उपचारासाठी लागणारा ५ लाखांचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आला.

मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी डॉ. मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

डॉ. कल्याण मुंडे यांनी अवघड शस्त्रकिया यशस्वी करुन बाळाला नवजीवन दिल्याबद्दल मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी डॉ. मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here