बांधिलकी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मा. राज्यपालांची भेट.

51

बांधिलकी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मा. राज्यपालांची भेट.

बांधिलकी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मा. राज्यपालांची भेट.
बांधिलकी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मा. राज्यपालांची भेट.

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई : – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकिय निमशासकिय अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना सेवेत असताना कोविड – १९ चे संक्रमण होउन त्यांचे अकाली निधन झाल्यास त्यांच्या वारसांना इतर सर्व नियम व अटी शिथिल करुन अनुकंपा तत्वावर विशेष खास बाब म्हणुन तात्काळ नोकरी देण्यात यावी या प्रमुख मागणी चे निवेदन घेउन बांधिलकी या सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज दि. ३०/१२/२०२१ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

या भेटीमध्ये म्युनसिपल को.अॉ. बँकेच्या सभासदांचे प्रश्न, मुंबई महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वेतन आदी दावे संबंधित प्रलंबित प्रश्न व इतरही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्यपालांनी या सर्व प्रश्नावर स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
यावेळी सदर शिष्टमंडळात प्रमोद सावंत, रावसाहेब सातपुते, कमलाकर शिंदे, प्रकाश अस्वेकर, रुपेश पुरळकर, मनोज सागरे इ. कार्यकर्ते सहभागी होते.

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०