अखेर जोगेश्वरीकरांना मनसेच्या पाठपुराव्यामुळे मिळाला श्याम नगर आसनदायी बसथांबा

73

अखेर जोगेश्वरीकरांना मनसेच्या पाठपुराव्यामुळे मिळाला श्याम नगर आसनदायी बसथांबा

पूनम पाटगावे

जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी

मो. नं. ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- जोगेश्वरी JVLR रोडवर मागील काही महिन्यापासून मेट्रोच्या कामासाठी तसेच रस्ता रुंदीकरण करण्यासाठी आसनदायी बसथांबे काढण्यात आले होते. याचा नाहक त्रास प्रवासी नागरिकांना सहन करावा लागत होता. त्यापैकी श्याम नगर बस थांब्यावर होत असलेली ही प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता जोगेश्वरी पूर्व प्रभाग क्र. ७३ चे मनसे शाखाध्यक्ष श्री. रमाकांत नर यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली. त्यांनी महानगरपालिका, दिल्ली मेट्रो (डी. एम. आर. सी ), जे कुमार, मजास बस डेपो यांच्याशी पत्रव्यवहार करून सतत पाठपुरावा केला. यामुळे आसनदायी बस थांब्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीला अखेर यश मिळाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे श्याम नगर बस थांब्यावरील प्रवासी नागरिकांना आसनदायी बसथांबा पुन्हा मिळाल्याने नागरिकांतून मनसेचे कौतुक करण्यात येत आहे. सदर बस थांबा उभारण्यासाठी मनसे चे उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, विभागाध्यक्ष बाबुभाई पिल्ले, उपविभागाध्यक्ष मंगेश गुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रभाग क्र.७३ मधील मनसैनिकांचे देखील सहकार्य लाभले. मनसेला महानगरपालिका -रस्तेविभाग – जे कुमार – दिल्ली मेट्रो – मजास बस डेपो यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेदेखील मनसेकडून आभार व्यक्त करण्यात आले.