चंद्रपूरचे असेही संवेदनशील आमदार, आगीच्या घटनेत नुकसान झालेल्या दुकानदारांच्या मदतीला आमदार जोरगेवार आले धावून

59

जोरगेवार यांनी घटनेची तत्काळ दखल घेत घटनास्थळावर जात पाहणी करुन केली आर्थिक मदत

मीडिया वार्ता वृत्तसेवा

📱 8830857351

चंद्रपूर : तुकुम येथील तिन दुकानांना रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली होती. दरम्यान रविवार, 31 डिसेंबर रोजी आमदार किशोर जोरगेवार यांनी या दुकानांची पाहणी केली असून पिडीत दुकान मालकांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी तहसील विभाग, महावितरण आणि मनपा च्या अधिका-यांची उपस्थिती होती.

तुकुम येथील मुक्ताई इलेक्ट्रिेकलच्या दुकानाला मध्य रात्रीच्या सूमारास आग लागली या आगीने लगतच्या दोन दुकानांना आपल्या कवेत घेतल्याने तिनही दुकानातील सामान जळून खाक झाले आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शाॅट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमीक अंदाज आहे. दरम्यान रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी या दुकानांची पाहणी केली असुन आगी मागचे कारण समजुन घेतले. अशा प्रसगांवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन पथकाने तत्पर राहण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना केल्या आहे. शाॅट सर्कीटमुळे वारंवार आग लागल्याचे प्रकार समोर येत आहे. यासाठी महावितरणनेही पुढाकार घेत याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे. याप्रसंगी आगीने नुकसान झालेल्या दुकान मालकांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली असून तात्काळ घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना केल्या आहे.