गोंडपिपरीत ४. ३० कोटींच्या विकासकामांचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन.

गोंडपिपरीत ४. ३० कोटींच्या विकासकामांचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन.

गोंडपिपरीत ४. ३० कोटींच्या विकासकामांचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन.

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230

गोंडपीपरी (ता. प्र) :– गोंडपिंपरी तालुक्याच्या विकासाकरिता आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत मात्र अचानक सत्ता बदल झाल्यानंतर नवीन सरकारने मंजूर विकासकामांवर स्थगिती आनली. मा. उच्च न्यायालयाने ती स्थगिती उठवून प्रलंबीत कामे सुरू केली. आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करून सरकारला वेठीस धरले आणि यामुळेच ग्रामीण रस्ते विकासाच्या निधीचा प्रश्न सुटला व येथे ४ कोटी ३० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व सुरूवात होत आहे असे मत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. दि. ३० डिसेंबर रोजी गोंडपीपरी तालुक्यातील या विकासकामाच्या भुमिपुजन प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
गोंडपीपरी तालुक्यात करंजी गावात २५ लक्ष रुपये खर्चुन गुरुदेव सेवा मंडळालगत समाज भवनाचे बांधकाम केल्या जाईल पुन्हा याच गावात तेथील राजमाता बहुउद्देशीय संस्थेजवळ सुध्दा समाजभवनाचे बाधकाम होणार असून त्यासाठी ३० लाखाचा खर्च मंजूर आहे. तालुक्यातील धानापूर (साईनगरी) येथील क्रीडा संकुल ते संजय पूडुटवार यांचे घरापर्यंत २० लाखाचा निधी खर्चुन सिमेंट कॉन्क्रेट रस्ता बांधकाम केल्या जाणार आहे. घडोली गावात नवीन वाचनालयाची इमारत लवकरच उभी होईल यासाठी २० लक्ष रुपयांचा खर्च मंजूर आहे. याशिवाय तालुक्यातील चेकघडोली गावातर्गत रामा-३५३ बी ते प्रजिमा-४८ नांदगाव रस्ता एलआर-०५, व्हीआर-५९ मार्गाचे काम ३ कोटी २० लक्ष रुपयाचा निधी खर्चुन पूर्ण होणार आहे. गणेशपिपरी येथील अमित दुर्गे ते विजय गुरूनुले, ग्रामपंचायत ते दवाई कळते यांचे घरापर्यंत सिमेंट कॉन्केट रस्ता बाधकामाला सुरवात होईल. त्यासाठी १५ लाखाचा निधी मंजूर आहे.
गोंडपिपरी तालुक्यात एकूण ४ कोटी ३० लाखाच्या विकासकामांचे भूमिपूजन क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे, तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, महिला तालुका अध्यक्ष सोनी दिवसे, नगराध्यक्ष कुळमेथे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, शहर अध्यक्ष राजू झाडे, तालुका उपाध्यक्ष नीतेश मेश्राम, नगरसेवक सचिन चींतावार, ग्रा पं सदस्य महेंद्र कुनघाटकर, अशोक रेचनकर, रंजना रामगिरकर, नगरसेविका वनिता वाघाडे, अनिल झाडे सारनाथ बक्षी, माजी उपसरपंच गौतम झाडे, विनोद नागापूरे, श्रीनिवास कंदणुरीवार, तुकेश वानोडे, रेखा रामटेके, आशिष निमगडे, उपसरपंच हरिदास मडावी, प्रा शंभू येलेकर, नामदेव सांगळे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here