श्री रविप्रभा मित्र संस्थेने तिमिरातून तेजाकडे घेऊन जाण्याचे उत्तम काम केले आहे.. डॉ.ढलाईत.

श्री रविप्रभा मित्र संस्थेने तिमिरातून तेजाकडे घेऊन जाण्याचे उत्तम काम केले आहे.. डॉ.ढलाईत.

श्री रविप्रभा मित्र संस्थेने तिमिरातून तेजाकडे घेऊन जाण्याचे उत्तम काम केले आहे.. डॉ.ढलाईत.

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगाव: म्हसळा शहरात श्री रविप्रभा मित्र संस्था व म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दि.२४ डिसें रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्या शिबिराला म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.या शिबिरा मार्फत नेत्र तपासणी, अनेकांना शिबिरात ज्यांचे नंबर आले होते त्यांना चष्मे वाटप करण्यात आले.तसेच काही जणांना तपासणी वेळी मोतीबिंदू सांगुन शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने आज म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल मध्ये डॉ.दिपक पाठक नेत्र रोग तज्ञ पुणे. यांच्या प्रमुख उपस्थितीत दहा जणांचे यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.यावेळी ज्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्या सर्वांनी डॉ.दिपक पाठक,व संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड व डॉ.ढलाईत यांचे आभार मानले.यावेळी बोलताना डॉ ढलाईत यांनी ज्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे ,त्या सर्वांना शस्त्रक्रिया झाल्यानंतर डोळ्यांची निगा कशा पद्धतीने घ्यावी याची सविस्तर माहिती दिली,वेळच्यावेळी औषधे घेणे, डोक्यावरून अंघोळ करु नये, चुलीजवळ जाऊ नये,डोळ्यांना त्रास होईल असे कोणतेही काम करू नये या संदर्भात सविस्तर माहिती सांगण्यात आली व आज तुमची यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली आहे याचे सर्वस्वी श्रेय मी श्री रविप्रभा मित्र संस्था नेवरूळ-रायगड. यांना देऊ इच्छितो कारण आज तुम्हाला खरच “तिमिरातून तेजाकडे” नेण्याचे उत्तम काम केले आहे असे देखील डॉ.ढलाईत यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले.संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी झाले आहे आणि खास करून मी डॉ.दिपक पाठक व डॉ.ढलाईत यांचे आभार मानले कारण शिबिर यशस्वी होण्यासाठी तुमचे मोलाचे योगदान मिळाले आहे ,यासाठी समाधान व्यक्त केले.या वेळी उपस्थित डॉ.दिपक पाठक, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड, डॉ.ढलाईत , सल्लागार संतोष उध्दरकर, खजिनदार सुशांत लाड, समीर लांजेकर, सुजित काते, दत्तात्रय लटके, श्रीकांत बिरवाडकर, अमित महामुणकर, कौस्तुभ करडे, लक्ष्मण कांबळे, तुकाराम महाडिक,हर्षद लटके, हॉस्पिटल कर्मचारी उर्मिला म्हात्रे, ऋतुजा म्हात्रे व नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आलेले रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here