आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवारच्या वतीने निशुल्क चष्मे वाटप कार्यक्रम
• ३०० नागरिकांना मोफत चष्मे वाटप
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 31 डिसेंबर
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात डोळे तपासणी केलेल्या नागरिकांना आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते निशुल्क चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी जवळपास 300 नागरिकांना लाभ घेतला. आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेविका शिला चव्हाण, माया उईके, कल्पना शिंदे, राशिद हुसेन, सुमित बेले, पंकज बेले, नकुल वासमवार, विश्वजित शहा आदींची उपस्थिती होती.
17 डिसेंबरला भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तुकुम येथेही आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास 500 हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले.
दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात या शिबिरात डोळे तपासणी करण्यात आलेल्या पात्र नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ चष्मे वाटप करण्यापुरता मर्यादित नाही, तर आपल्या समाजाच्या आरोग्य आणि कल्याणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. डोळे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहेत. दृष्टी चांगली असेल, तर आपले जीवन अधिक चांगल्या पद्धतीने घडवता येते. त्यामुळे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे चष्मे घेणे शक्य नव्हते, त्यांना मदत करण्याच्या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात जवळपास 300 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.