हॅन्डबॉल स्पर्धेत एसपी कॉलेजने तृतीय क्रमांक पटकविला

34
हॅन्डबॉल स्पर्धेत एसपी कॉलेजने तृतीय क्रमांक पटकविला

हॅन्डबॉल स्पर्धेत एसपी कॉलेजने तृतीय क्रमांक पटकविला

हॅन्डबॉल स्पर्धेत एसपी कॉलेजने तृतीय क्रमांक पटकविला

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 31 डिसेंबर
गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलांच्या व मुलींच्या हॅन्डबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय तृतीय क्रमांक पटकाविला आहे. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन हॅन्डबॉल स्पर्धा ब्रम्हपुरी येथील एन. एच. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला. या हॅन्डबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. तृतीय क्रमांक खेचून आणण्याकरिता मुलींच्या संघात दीपाली शेंडे, मयुरी आलम, स्नेहा गाणफाडे, खुशी चहारे, आरती बारसागडे, कीर्तना इदुलवार, मीना कृष्णपल्लीवार, मोनिका गराड, मयुरी ताजने, सलगम गुप्ता, अंजली नागपुरे, दिव्या दुर्गे यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.